आनंद मोरे यांची अध्यक्षपदी फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:15+5:302021-07-23T04:24:15+5:30

---------------------------------- कोरोनाचे नवे ८३ रुग्ण कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवीन ८३ रुग्ण आढळून आले. तर, उपचाराअंती ९२ ...

Re-election of Anand More as President | आनंद मोरे यांची अध्यक्षपदी फेरनिवड

आनंद मोरे यांची अध्यक्षपदी फेरनिवड

googlenewsNext

----------------------------------

कोरोनाचे नवे ८३ रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवीन ८३ रुग्ण आढळून आले. तर, उपचाराअंती ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३८ हजार ४६४ रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३४ हजार ९४२ रुग्ण बरे झाले आहेत.

------

सोनसाखळी लंपास

कल्याण : द्वारली येथे राहणाऱ्या सीताबाई चिकणकर या त्यांच्या नांदिवली रोडवरील भानुदास हॉटेलवर एकट्या असताना दोन अनोळखी व्यक्ती चहा, सिगारेट, पाण्याची बाटली घेण्याच्या निमित्ताने आल्या; आणि त्यांनी सीताबाई यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. ही घटना बुधवारी सकाळी ५.१५ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

----------------------------------------

घरफोडीत दोन लाख लंपास

डोंबिवली : पूर्वेतील चंद्रेश ओयेसीस या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शुभांगी हितारे यांचे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ दरम्यान घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

केडीएमसी हद्दीत आज लसीकरण नाही

कल्याण : राज्य सरकारकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

--------------------------------------------

फांद्यांचा कचरा जैसे थे

डोंबिवली : शहरातील वीजवाहिन्यांना अडथळा होत असलेल्या झाडाच्या फांद्या १० दिवसांपूर्वी तोडण्यात आल्या होत्या. परंतु, आजही या फांद्यांचा कचरा त्याच ठिकाणी पडून आहे. केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्या उचलून ठेवण्याचा विसर पडला आहे. विशेष म्हणजे हा कचरा केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या समोरील रोडवर पडलेला आहे. पण, त्याकडे कानाडोळा केला जात असून, तो चर्चेचा विषय ठरला आहे.

--------------------------------

Web Title: Re-election of Anand More as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.