सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 01:33 AM2019-11-24T01:33:58+5:302019-11-24T01:34:14+5:30

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते.

Reaction on political drama took place in Maharashtra | सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

googlenewsNext

- स्नेहा पावसकर

ठाणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते. ठाण्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळीनीही यावर आपल्या भाषेत शेरेबाजी केली आहे. आजचं हे एकूणच राजकीय नाट्य पाहून १९५२ साली विंदांनी लिहिलेली ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या राजकारणालाही लागू पडते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.

महाराष्टÑाच्या राजकारणात शुक्रवारी सकाळीच भूकंप झाला आणि त्याचे पडसाद अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावरून उमटले. कवी महेश केळुसकर यांनी फेसबूकवर ‘काकांनी पावसात भिजवलेला ओला लंगोट वाळायच्या आत पुतण्याच्या ढुंगणाला खाज सुटली..., ताणता राजा’ अशा शब्दात पोस्ट शेअर केल्या. आज महाराष्टÑात जे काही घडलं ते मतदारांच्या आकलनापलीकडे चाललयं. विंदांनी लिहिलेली कविता आजही लागू पडते. पण विंदा असे म्हणाले होते की, ही कविता जेव्हा कालबाह्यहोईल तेव्हा मला आनंद होईल. पण विंदांना आनंद होईल असा क्षण येईल असे दिसत नाही, असेही केळुसकर म्हणाले.

दुसरीकडे आजचा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या प्राण्यांनाही लाजवेल असाच आहे. नीती, नियम, तत्त्व हे सगळं या राजकीय मंडळीनी सोडून दिलं आहे. तसेच आता कोणाचेही सरकार आले तरी, सर्व पक्षांच्याबाबत महाराष्टÑाच्या जनतेने अविश्वासाचा ठराव मूकपणे संमत केलेला आहे, हे नक्की अशा शब्दात कवी अशोक बागवे यांनी या राजकीय घडामोडीचा निषेध व्यक्त केला.

अरूण म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या सत्तास्थापनेतून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचे म्हटले आहे. लोकांना गृहीत धरल जातं, परंतु आजच्या घडामोडींनंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. अशा अभद्र पद्धतीनेही काही होऊ शकतं, हे आता लोकांना कळलंय. हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात झालायं, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.

ज्येष्ठ लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी तर दिवसभरात घडलेल्या घटना म्हणजे एखाद्या नाटकाप्रमाणे वाटते आणि हे नाटक अजून संपलेलं नाही. ते सुरू राहणार आहे. मुळातच मला या राजकीय घडामोडींवर आधारित एक नाटक लिहावसं वाटतंय, असे मत अशोक समेळ यांनी व्यक्त केले. मात्र गनिमी कावा हा शिवरायांनीही रात्रीच्या काळोखातच केला आणि आता भाजपनेही रात्रीच्या काळोखातच केला. बाकी कोणी कोणासोबत जावून सरकार स्थापन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असेही अशोक समेळ म्हणाले.

Web Title: Reaction on political drama took place in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.