वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले- वीणा गवाणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 05:26 PM2018-02-10T17:26:50+5:302018-02-10T17:26:54+5:30

‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी दिली.

Reading made my writing enriched- Veena Gawankar | वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले- वीणा गवाणकर

वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले- वीणा गवाणकर

Next

डोंबिवली- माझ्या लहानपणी मी कधीही मैदानी खेळ खेळात रमले नाही. खेळाऐवजी पुस्तकांचे वाचन विपुल केले. वाचनांची आवड असल्याने मुलांनाही मी छोटी छोटी चरित्र विकत आणून देत असत. आत्मचरित्र आणि व्यक्ती चित्रण वाचायला मला खूप आवडत असे. कार्व्हर ही एक वृत्ती आहे. कार्व्हर वाचल्यावर तो मुलांना सांगितले पाहिजे असे वाटले. त्यातूनच ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी दिली.

श्री गणेश मंदिर संस्थान आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्यातर्फे ‘पर्यावरण कट्टा‘ या अंतर्गत वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. श्री गणेश मंदिर संस्थान येथे हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. गवाणकर म्हणाल्या, आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांने गौरविण्यात आले आहे. पण माझ्यासाठी माझे बोलणे ऐकायला येणारा प्रेक्षक मला पुरस्कारांपेक्षा मोठा वाटतो. ज्यांच्याकडे काहीच नाही त्याला शून्यातून जग निर्माण करायचे असते. ज्यांना आई-वडील नसतात त्यांना कोण सांगणार हे कर किंवा करू नको. त्यांना कोणतीही सबब सांगता येत नाही.

सध्या आईवडील सांगतात त्याप्रमाणे मुले शिक्षण घेतात त्यातही त्यांना करिअरची मोजक्याच वाटा माहित असतात. पण मुलांनी जे काही करियर निवडले आहे. त्यात चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. निर्णय घ्यायला शिका. आपण ही गोष्ट कशासाठी शिकतो हे प्रथम ठरवा. तुमच्या आजूबाजूला देखील एखादा कार्व्हर असू शकतो. त्यामुळे कोणाची ही टिंगल उडवू नका. कोणाला मदतीच्या गरज असेल तर त्याला मदतीचा हात दया, असा सल्ला ही त्यांनी दिला.

शेतक-याविषयी बोलताना गवाणकर म्हणाल्या , आपण डबल स्टॅर्ण्ड जगणारे लोक आहोत. भाजीची जुडी ४० रूपयांवरून १० रूपयांवर आली की आपलेल्या बरे वाटते. पण ती त्या शेतक-याला परवडते का यांचा आपण विचार करीत नाही. शेतीला जोड व्यवसाय नाही. प्रक्रिया उदयोग ही आपल्याकडे कमी आहेत. शेतक-यांच्या श्रमाचे मोल आपण लावत नाही. फुकट सेवा आपल्याला सोपी वाटते.
 

 

Web Title: Reading made my writing enriched- Veena Gawankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.