जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 03:04 PM2018-11-15T15:04:30+5:302018-11-15T15:08:42+5:30

जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. 

Reading opinions, the opinions of dignitaries in Jawahar Lecture reading inspiration day program | जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

googlenewsNext
ठळक मुद्देजगण्याला प्रेरणा देते ते वाचनजवाहर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन  जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ठाणे : ‘वेद आणि संत साहित्य ही भारतीय तत्त्वज्ञानाची, संस्कृतीची परंपरा आहे. गुरु-शिष्य परंपरा आणि मौखिक साहित्यातून हजारो वर्षांपासून ही परंपरा रुजली आहे. त्यातून वाचनसंस्कृतीचा विकास झाला. हे वाचनच जगण्याला प्रेरणा देणारे ठरले आहे,’ असे विचार कळवा येथील जवाहर वाचनालयाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले. 
             या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, समीक्षक अरविन्द दोडे अध्यक्षस्थानी होते तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय युवाशक्तीच्या प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ठाणे भूषण ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. शाहू रसाळ, कवी बाळ कांदळकर, साहित्यिक रामदास खरे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी युवा कवयित्री जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ या ठाण्यातील सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे सचिव सुशांत दोडके व कार्यकारिणी सदस्या आशा मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर निशिकांत महांकाळ यांनी कार्यक्रमाचे आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना दोडे यांनी संत वाङ्मय, पाठांतर, संस्कारांचे महत्त्व, कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे कार्य, इंग्रजी भाषेतील साहित्याचा मराठीतील अनुवाद, वाचनाची आवड आपले विचार कसे समृद्ध करते आदी विविध विषयांवर भाष्य केले. प्रा. दीपा ठाणेकर यांनी युवाशक्तीच्या वाचन प्रेरणांविषयी मते मांडली. ‘वाचनाकडे दुर्लक्ष करणाऱया मुलांना दोष न देता त्यांच्या पालकांनी पुस्तकांची आवड निर्माण करायला पाहिजे, मराठी भाषा-साहित्य-संस्कृती यांसाठी उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे, युवापिढी ज्या समाजमाध्यमांवर लिहिती झाली आहे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, मनोरंजन आणि बौद्धिक भूक भागविण्यासाठी वाचन किती महत्त्वाचे झाले आहे, याचा विचार झाला पाहिजे,’ आदी मुद्दे त्यांनी मांडले. डॉ. शाहू रसाळ यांनी जुई प्रधान यांच्या काव्यसंग्रहाचे निरुपण करताना कवयित्रीला शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी ‘अलवार’ काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. जुई प्रधान यांनी आपल्या कवितांमागील भूमिका विशद करताना मनोगत व्यक्त केले. यावेळी साहित्यिक चांगदेव काळे, कवयित्री वैदेही केवटे, रंगकर्मी आदित्य संभुस, कवी-गीतकार राजेंद्र ठाकुर, अॅड. रुपेश पवार, राजेंद्र गोसावी, प्रतिक्षा बोर्डे, आणि विनोद पितळे आदी रसिक उपस्थित होते.

Web Title: Reading opinions, the opinions of dignitaries in Jawahar Lecture reading inspiration day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.