भिवंडी मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची पुन्हा बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 07:28 PM2022-02-08T19:28:58+5:302022-02-08T19:29:08+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली; भाजपाच्या मदतीने शिवसेनेचे संजय म्हात्रे सभापती पदी विजयी

Rebellion of Congress candidates in Bhiwandi Municipal Corporation Standing Committee election | भिवंडी मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची पुन्हा बंडखोरी

भिवंडी मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची पुन्हा बंडखोरी

Next

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी महापालिका निवडणुकीत कुठला पक्ष कधी पलटी मारेल याचा काही नेम वर्तविण्यात येत नाही . त्यातच आता स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत प्रदेशाध्यक्षांच्या पक्षादेशाला केराची टोपली दाखवत सेनेच्या उमेदवाराला विजयी केले आहे. विशेष म्हणजे राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेली सेना भाजप यांची युती स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भिवंडीत मंगळवारी पाहायला मिळाली आहे. भिवंडी मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसला लाथाडून भाजपशी युती केल्याने काँग्रेस उमेदवाराचा प्रभाव करत शिवसेनेचे संजय म्हात्रे प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे  सेनेने महापालिकेच्या अंतिम टप्यात राज्यभर युतीत असलेल्या काँग्रेसला विरोध करत भाजपला जवळ केल्याने शिवसेनेने शहरात काँग्रेसलाच नामोहरम केले असून आधी काँग्रेसचे १८ तर आता ६ नगरसेवक फुटल्याने शहरात काँग्रेसची पुरता वाताहात झाली आहे.

            भिवंडी पालिका मुख्य सभागृहात दृक्श्राव्य माध्यमाने पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या सभेत सभागृहात आयुक्त सुधाकर देशमुख ,अतिरीक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील नगरसचिव अनिल प्रधान जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले व दोन्ही उमेदवार सभागृहात उपस्थित होते.

          एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना तब्बल १४ तर काँग्रेसचे अरुण राऊत यांना केवळ दोनच मते मिळाली आहेत.त्यामुळे सुरुवातीपासून बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे . शिवसेनेच्या संजय म्हात्रे यांना सेनेची २ मते , कोणार्क विकास आघाडीची २, भाजप ४ तर काँग्रेसच्या सर्वाधिक ६ सदस्यांनी मतदान केल्याने म्हात्रे यांचा विजय झाला आहे.  

          २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने विजय संपदान केलेल्या काँग्रेस पक्षाने शिवसेने सोबत आघाडी केली होती ,त्यानुसार उपमहापौर पद शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र त्यांनतर २०१९ मध्ये महापौर निवडणुकीत काँग्रेस च्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडी व भाजपा सोबत युती केल्याने काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्याच बंडखोरीची पुनरावृत्ती पालिका सभागृहात होत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस गटनेता हलीम अन्सारी यांना काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर ही स्वतः स्थायी समिती सदस्य असणाऱ्या खुद्द काँग्रेसच्या गटनेत्यानेच पक्षाआदेशास केराची टोपली दाखवीत तयांच्यासह सहा काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात आपले मतदान केले. 

           भिवंडी महानगरपालिका सभागृहात काँग्रेस बहुमताने सत्तेत असतानाही काँग्रेस पक्षाचा पराभव घोडेबाजारीच्या बंडखोरीतून झाला असून त्यामध्ये मोठी आर्थिक हितसंबंध जोपासले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या काँग्रेस गटनेता सह सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असून शिवसेने शहरातील काँग्रेस संपविण्यासाठी हि खेळी केली असावी अशी प्रतिक्रिया पराभूत काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांनी दिली आहे .

Web Title: Rebellion of Congress candidates in Bhiwandi Municipal Corporation Standing Committee election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.