गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी २४ .५५ कोटी ठाणे जिल्ह्याला प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:01 PM2018-10-06T17:01:15+5:302018-10-06T17:06:25+5:30
ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली.
ठाणे : एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी ठाणे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २४ कोटी ५५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून तातडीने संबंधित शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावर जमा करून द्यावी असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कृषी विभागाला दिली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात कृषी विभागाच्या बैठकीतजिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने,जिल्हा कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे देखील उपस्थित होते.
ठाणे तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५.३८ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र २४९२.०१ हेक्टर असून ७८२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अंबरनाथ तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १८६९.६२ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १०३५३.५० हेक्टर असून २७५५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शहापूर तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र ८७१०.८९ हेक्टर असून २६७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भिवंडी तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५६२.०५ हेक्टर असून २०२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता.