शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:25+5:302021-03-08T04:37:25+5:30

............... पाणीटंचाईसाठी आराखडा तयार यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहेत. या खर्चातून ...

Recognition of Shahapur as a dam taluka | शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळख

शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळख

Next

...............

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहेत. या खर्चातून ७६ गावे, ५२ पाडे आणि १२९ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यावर तब्बल १८ कोटी ९९ लाखांचा खर्च होणार आहे. सहा गावांच्या व ११ पाड्यांच्या आणि १७ योजनांच्या कूपनलिकांच्या दुरुस्तीलाही चार लाख रुपये खर्चाची तजवीज केली आहे.

.......

बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा

शहापूर तालुक्यातील कसारा, खर्डी, वाशाळा आदी गावांसह परिसरातील पाड्यांमध्ये सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यांना त्वरित बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या गावांच्या दौऱ्याप्रसंगी शनिवारी केली आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी ८२ लाखांची तरतूद केली आहे.

........

तात्पुरत्या योजनांवर सात कोटी ९३ लाखांचा खर्च

जिल्ह्यातील १५ गावे, १३ पाडे आणि २४ पाणीपुरवठा योजनांना तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणची आठ गावे, तीन पाडे आणि दहा पाणीपुरवठा योजनांच्या तात्पुरत्या पाण्यासाठी दोन कोटी १९ लाखांचा खर्च होईल. तर शहापूरच्या चार गावांसह आठ पाडे आणि १२ योजनांवरही साडेतीन कोटींचा खर्च होणार आहे. मुरबाडच्या दोन योजना, सहा गावपाड्यांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर दोन कोटी २० लाख खर्च करण्यात येणार आहे.

....

जिल्ह्यातील एकूण गावे - १६९७,

बोरवेल दुरुस्ती होणार - १७ गावपाडे, १७ पा.पु.यो.

पाणी पु.यो. दुरुस्ती -१२८ गावपाडे, १२९ योजना

.............

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावपाडे - २८४ गावे, ५३२ पाडे

बोरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४१ गावपाडे, २५० योजना

पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणार - ५५४ योजना

Web Title: Recognition of Shahapur as a dam taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.