उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची विक्रमी वसुली, ११२ कोटी ५४ लाख वसुली
By सदानंद नाईक | Published: April 1, 2024 06:28 PM2024-04-01T18:28:09+5:302024-04-01T18:36:59+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य उत्पन्नाच्या स्रोता पैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागाने ३१ मार्च पर्यंत एकून ११२ कोटी ५४ लाख, ५४ हजार ७५५ रुपये विक्रमी वसुली झाली. गेल्या वर्षी फक्त ६४ कोटी २९ लाख वसुली झाल्याने, मालमत्ता कर विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य उत्पन्नाच्या स्रोता पैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्या वर्षी ६०० कोटी पेक्षा जास्त थकबाकी असतांना फक्त ६४ कोटी २९ लाख वसुली झाली, कमी वसुलीमुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. आयुक्त अजीज शेख यांनी सन-२०२२-२३ वर्षी विभागाकडे लक्ष देवून दोन वेळा अभय योजना लागु करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. यातूनच यावर्षी विक्रमी सर्वाधिक ११२ कोटी ५४ लाख ५४ हजार ७५५ रुपयांची वसुली झाली. तर दोन वर्षांपूर्वी सन-२०२१-२२ साली १०९ कोटी विक्रमी वसुली झाली होती.
तर विभागाची थकबाजी ७०० कोटी पेक्षा जास्त झाली आहे. महापालिका मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदनी व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी विविध हातखंडे वापरले आहे. चालू वर्षात १५० कोटी पेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली होण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले. मोठे थकबाकीधारकांची यादी प्रसिद्ध करून थकबाकी वसुलीकडे महापालिका लक्ष देणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले. महापालिकेला शासन जीएसटी अनुदान, बांधकाम परवानगी पोटी मिळणारे उत्पन्न यासह इतर पर्यायी उत्पन्नात वाढ होणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिले आहे.