छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ३६८ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:42+5:302021-05-15T04:38:42+5:30
कोरोना महामारीमध्ये रुग्णांना रक्त आणि प्लाझ्माची निकड भासू लागली आहे. ही लढाई फत्ते करण्यासाठी ठाण्यातील मराठा जागृती मंच ...
कोरोना महामारीमध्ये रुग्णांना रक्त आणि प्लाझ्माची निकड भासू लागली आहे. ही लढाई फत्ते करण्यासाठी ठाण्यातील मराठा जागृती मंच पानिपत ठाणे विभाग, शिवराय प्रतिष्ठान, कर्तव्य-एक सामाजिक जाणीव संस्था (महाराष्ट्र), नवयुग मित्र मंडळ, मावळा संघटना, झेप प्रतिष्ठान, मराठा क्रांती सेवा संघ, मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा, कोलबाड मित्र मंडळ, छावा ढोल ताशा पथक ठाणे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे, अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज, ठाणे, पंचशील गणेशोत्सव मंडळ, मातोश्री प्रतिष्ठान, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मराठा उद्योजक लॉबी, ग्रँड मराठा फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मावळी मंडळ शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या हस्ते सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्या तरुणीपासून ६० वर्षापर्यंत नागरिकांनी रक्तदान केले. काही अपंग व्यक्तींनी ही रक्तदान करून कोरोना लढ्यात उडी घेतली. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विश्वनाथ केळकर, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावडे, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ठाणे जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशांक पवार, सुहास देसाई आदींनी कार्यकर्ते आणि रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, संकेत शिंदे, अनंत कांबळे, तृषल सूर्यवंशी यांच्यासह अन्य पोलिसांनीही रक्तदान केले.