ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

By सुरेश लोखंडे | Published: December 6, 2022 06:18 PM2022-12-06T18:18:35+5:302022-12-06T18:18:52+5:30

जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Record production of 39 quintals per hectare of kharif rice in Thane district this year! | ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

Next

ठाणे : जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भात उत्पादनाच्या विक्रमी व भरघोस उत्पादन वाढीमुळे जिल्ह्यातील बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा ५५ हजार ६०३ हेक्टर शेतीत भात पिकांची लागवड झाली होती. त्यावर यंदाच्या वर्षी सरासरीच्या ११२ टक्के एवढा मुबलक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या खरीप हंगामातील भातासाठी १० हजार ८४२.१६ मे.टन खताचा वापर शेतकºयांनी केलेला आहे. या हंगामात संकरित वाणाची ७६८.४७ क्विंटल व सुधारित वाणाची १० हजार ३१७ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकºयांनी केलेला आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत भात पिकाच्या कापण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकºयांची मेहनत, सुधारित व संकरित जाती व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, निसगार्ची साथ, भात पिकावरील किड, रोग सर्वेक्षणावरील प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जोड असल्याने चालू वर्षी भाताच्या उत्पन्नात २३ टक्के वाढ झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात हेक्टरी ३९ क्विंटल ४२ किलो विक्रमी भाताचे उत्पादन हाती आल्याचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Record production of 39 quintals per hectare of kharif rice in Thane district this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.