सलग सात वर्षे ययातीचा शालेय उपस्थितीचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:26 PM2019-04-20T23:26:36+5:302019-04-20T23:26:49+5:30

विविध उपक्र मात सातत्याने सहभाग; राष्ट्रीय रेकॉर्डशी बरोबरी करणार

Record of school attendance for seven consecutive years | सलग सात वर्षे ययातीचा शालेय उपस्थितीचा रेकॉर्ड

सलग सात वर्षे ययातीचा शालेय उपस्थितीचा रेकॉर्ड

Next

बोर्डी: ‘हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कुल’ हा राज्यस्तरीय रेकॉर्ड डहाणूतील ययाती शैलेंद्र गावड हिच्या नावावर असून सातव्या शैक्षणिक वर्षात तिने एकही दिवस खाडा केलेला नाही. राष्ट्रीयस्तरावरील रेकॉर्ड भोपाळच्या मानसी दास या विद्यार्थिनीच्या नावावर असून ती सलग नऊ वर्ष गैरहजर राहिली नव्हती.

या वर्षी ययातीने आठवीची परीक्षा दिली असून मानसीच्या रेकॉर्डशी बरोबरीसाधायची असल्यास आणखी दोन वर्ष हा परफॉर्मन्स घ्याव लागणार आहे. २०१२-१३ सालापासून दुसरी इयत्ते असताना हजेरी पटावरतीने तीने शंभर टक्के उपस्थिती नोंदवली होती. त्यानंतर बोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात अ‍ॅडमिशन घेतले. अभ्यासात हुशारी गाजवत असतांना विविध स्पर्धा, शाळाबाह्य उपक्र म आणि उत्तम लेदर बॉल क्रि केटर असून तेथेही मैदान गाजवत आहे.

नियमित अभ्यासासह ती त्याच उत्साहाने नेट मध्येही घाम गाळते. सायकल चालविण्यासह भटकंती करणे तिला पसंत आहे. गावातील तलाव-ओहळ, डोंगर- टेकड्या ज्या गतीने पालथ्या घालते तशी वन्य प्राण्यांच्या पाणवठ्यावर बसून निरीक्षणही करते. भविष्यात वाईल्डलाईफ क्षेत्रात स्वत:चा हातभार द्यायचा तिचा मानस असून तिला वडीलांप्रमाणे सर्पमीत्र व्हायचे आहे. याबाबतचे धडे गिरविण्याकरिता त्यांच्यासह रेस्क्यू वेळी फिल्डवर जाते.

दरम्यान तिचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याने शारीरिक तंदुरु स्ती, मानसिक धेर्य तिच्या जवळ असल्याने हेच तिच्या यशाचे गमक आहे.
केवळ रेकॉर्ड बनविण्याकरिता दररोज शाळेत जात नसून कसोटी क्रि केटर व्हायचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करायचेच हा त्यामागचा हेतू तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. तिच्या या विक्र माने डहाणूतील नागरिक, शाळा आणि गावड भंडारी समाजातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
(अनिरुद्ध पाटील, बोर्डी)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या समर व्हेकेशन कॅम्प २०१९ करिता सोळा वर्षाखालील दहिसर ते डहाणू या विभागाची संघ निवड प्रक्रि या नुकतीच पार पडली असून लेगस्पिनर म्हणून ययातील संधी देण्यात आली आहे. तिच्यातील सातत्यामुळेच अभ्यास आणि शाळा व शाळाबाह्य उपक्र मात ती यशस्वी ठरत आहे.

Web Title: Record of school attendance for seven consecutive years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.