बिरवाडी उपकेंद्रात विक्रमी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:20+5:302021-06-24T04:27:20+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यात बुधवारी दुसऱ्या महालसीकरण मोहिमेत बिरवाडी उपकेंद्रात विक्रमी लसीकरण झाले असले, तरी आदिवासी व कातकरी यांच्यासाठी ...
भातसानगर : शहापूर तालुक्यात बुधवारी दुसऱ्या महालसीकरण मोहिमेत बिरवाडी उपकेंद्रात विक्रमी लसीकरण झाले असले, तरी आदिवासी व कातकरी यांच्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेत तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचाय क्षेत्रातील भातसानगर, साजीवली, कुकांभे, बिरवाडी व आदिवासी मेंगाळ पाडा, मढवी पाडा, चौकीचा पाडा, नावूचा पाडा, शेंडे गाव, लीमन पाडा, प्रधान पाडा व दोन कातकरी वाडी येतात. मात्र या आदिवासी व कातकरी वाडी मिळून चार हजारच्या आसपास लोकसंख्या आहे. शिवाय १८ वर्षे व त्यापुढील अशी दीड हजारांवर लोकसंख्या असूनही एकही आदिवासी व कातकरी या लसीकरण केंद्राकडे फिरकला नाही.
तालुक्यातील सर्वात जास्त संख्येने कातकरी या उपकेंद्रात राहत असले, तरी त्यांना वारंवार या लसीकरण मोहिमेबाबत सांगूनही ते घ्यायला तयार होत नाहीत. त्यामुळे ही मोहीम आता पाडे व वाड्यांमध्ये राबविणे आवश्यक ठरणार आहे. बिरवाडी उपकेंद्रात १८ वयोगटातील २२१, ४५ वयोगटातील ५७, ६० वयोगटातील ४३ जणांनी कोरोनाची लस घेतली. तालुक्यातील १५ उपकेंद्रांवर २१७१ लाभार्थी, तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ९०९ असे एकूण ३०८० लाभार्थ्यांचे एकाचदिवशी लसीकरण करण्यात आले.
या लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके, डॉ. कुंदन चव्हाण, डॉ. बाबाराव जाधव, मोहिनी भिसे, मनोहर जाधव, दीपक दवणे, हिरामण संगारे, विश्वास फर्डे, भालचंद्र भोईर, अविनाश भेरे, अनंता भोईर, दीपक विशे, माधुरी हीले, रत्ना पाटील यांनी बिरवाडी उपकेंद्रात विशेष मेहनत घेतली.