स्वातंत्र्यदिनी जिल्हा शासकीय रुग्णालयात विक्रमी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:20 AM2021-08-17T01:20:49+5:302021-08-17T01:21:31+5:30

एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्हयात तुटवडा जाणवत असतांनाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दीड हजारांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देत विक्र मी लसीकरणाची नोंद केली.

Record vaccination at District Government Hospital on Independence Day | स्वातंत्र्यदिनी जिल्हा शासकीय रुग्णालयात विक्रमी लसीकरण

स्वातंत्र्यदिनी जिल्हा शासकीय रुग्णालयात विक्रमी लसीकरण

Next
ठळक मुद्देएकाच दिवसात दीड हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्हयात तुटवडा जाणवत असतांनाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दीड हजारांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देत विक्र मी लसीकरणाची नोंद केली. या अनोख्या कामगिरीमुळे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. कैलास पवार यांनी आपल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले आहे.
ठाणे जिल्ह्यात जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसीच्या अपूºया पुरवठयामुळे लसीकरणाची मोहीम पालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेला काही काळ बंद ठेवावी लागली होती. लसीच्या अपुºया पुरवठयामुळे ठाणे महापालिकेच्या काही केंद्रावरही वादाचे प्रसंग ओढवले होते.
दरम्यान, रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य मोहत्सवी वर्षाचे औचित्य साधत आरोग्य उप संचालक डॉ. गौरी राठोड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास साळवे तसेच त्यांच्या चमूने जिल्हा सामान्य रु ग्णालयात आॅफलाईन पद्धतीने पहिला आणि दुसरा डोस असे एक हजार ५६२ जणांचे विक्र मी लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य मोहोत्सावी वर्षाचे औचित्य साधत १५ आॅगस्ट रोजी जिल्हा
रु ग्णालयात ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी लसींचा साठा देखील उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे एका दिवसात दीड हजाराहून अधिक नागरिकाचे लसीकरण करण्यात यश आले.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
 

Web Title: Record vaccination at District Government Hospital on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.