कोटींची घेण्यापेक्षा थकीत देणींची वसुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:48+5:302021-06-22T04:26:48+5:30
ठाणे : महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीकरिता एमएमआरडीए अथवा सिडकोकडून १ हजार कोटी रुपये कर्जाऊ घेण्याचा मनोदय महापौरांनी महासभेत मांडला; मात्र ...
ठाणे : महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीकरिता एमएमआरडीए अथवा सिडकोकडून १ हजार कोटी रुपये कर्जाऊ घेण्याचा मनोदय महापौरांनी महासभेत मांडला; मात्र आधीच आर्थिक उधळपट्टी सुरू असलेल्या पालिका प्रशासनाने हजारो कोटी कर्जाऊ घेऊन सण साजरे करण्यापेक्षा थकीत देणी वसूल करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. तसे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सोमवारी आयुक्तांना दिले.
आधीच मेट्रो प्रकल्पासाठी ठेकेदाराला ७५ हजार ३६० चौ.मी. जागा फुकटात दिली आहे. त्या जागेचे ९६ कोटी रुपये अद्याप वसूल केलेले नाहीत. तसेच मेट्रो प्रकल्पाकरिता विकासकाकडून वर्धित दराने ३०८ कोटी रुपये वसूल न केल्याने पालिकेचे नुकसान झाले आहे. या थकीत देण्यांची वसुली केल्यास थेट ४०४ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत. असे पत्रात नमूद केले आहे.
विरोधी पक्षांच्या निवेदनाचा विचार व्हावा
नवीन वाहन खरेदी, आवश्यकता नाही अशा ठिकाणी उभारण्यात येणारे स्कायवॉक, जुने ठाणे, नवीन ठाणे पार्क, बॉलीवूड थीमपार्क, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट या कथित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर आधीच ठाणेकरांचे करोडो रुपये उधळून डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून ही नेतेमंडळींची चमकोगिरी सुरू आहे.
.....
केंद्र असो किंवा राज्य शासन असो कोणतीही संस्था ही कर्ज काढूनच चालत असते. त्यामुळे कोणती शासकीय संस्था यासाठी कर्ज देईल का याचा अभ्यास सुरू आहे. कर्ज घेतल्याने जी कामे सुरू आहेत, त्यांची बिले अदा करता येतील किंवा ज्या कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. ती कामे वेळेत सुरू न केल्याने खर्च वाढतो. त्यामुळे कर्ज घेतल्यास हा खर्चदेखील कमी होणार आहे. त्यातही ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांना विचारतो कोण. महापालिकेचा विचार करण्यास आम्ही सक्षम आहोत.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)