पुन्हा पकडल्या एक कोटी ३६ लाखांच्या जुन्या नोटा
By admin | Published: March 5, 2017 03:29 AM2017-03-05T03:29:28+5:302017-03-05T03:29:28+5:30
चलनातून रद्द झालेल्या जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या १ कोटी ३६ लाखांच्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केल्या. याच प्रकरणात चार जणांना ताब्यात
ठाणे : चलनातून रद्द झालेल्या जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या १ कोटी ३६ लाखांच्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केल्या. याच प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्तकनगर पोलिसांना उपवन येथे चारचाकी वाहनातून काही जण जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांच्या पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली आहे. यात ७२ लाखांच्या पाचशेच्या नोटा असून उर्वरित रकमेच्या नोटा एक हजारांच्या असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ-५ चे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. ठाणे आणि परिसरात गेले काही दिवस सातत्याने चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त होत आहेत. सरकारने मुदत दिल्यानंतरही या नोटा शिलल्क कशा राहिल्या, आता नेमक्या कोणत्या व्यक्ती त्या ताब्यात घेणार होत्या, या दृष्टीने तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)