आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:03 AM2017-09-08T03:03:38+5:302017-09-08T03:03:42+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे.

 Recovery of funds for the Aadhaar card, complaint to Tehsildar: | आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत

आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत

googlenewsNext

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असून त्याची पावती मात्र दिली जात नाही, याची तक्रार विटावा येथील नागरिकाने केल्यावर त्याचे ३० रुपये मात्र परत केल्याचे आढळले आहे.
आधारकार्ड काढणे, जुन्या कार्डमधील नावात, पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर संबंधित कंपनीला आधारकार्ड केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. केंद्रावर येथील एनआयसी विभागाचे मॉनिटरिंग असल्याचे चौकशीअंती कळाले. नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रावरून विनामूल्य आधारकार्डसंबंधी सेवा होणे अपेक्षित आहे. परंतु, कामानुसार पैसे घेतले जात असून त्याची पावती दिली जात नाही, याशिवाय केलेल्या कार्डच्या दुरुस्तीचे प्रिंटही दिले जात नसल्याची तक्रार विटावा येथील नागरिक नामदेव वाघ यांनी तहसीलदार घारे यांना केली.
या तोंडी तक्रारीस अनुसरून पावती देणे अपेक्षित असल्याचे घारे यांनी सांगितले. त्यानंतर, त्यांनी एनआयसीमधील आयटीच्या एका कर्मचाºयास वाघ यांना भेटायला सांगितले. संबंधित कर्मचाºयाची वाघ यांनी आधारकार्ड केंद्रात बराच वेळ प्रतीक्षा केली. त्यानंतर घेतलेले ३० रुपये परत केल्याचे वाघ यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले.

Web Title:  Recovery of funds for the Aadhaar card, complaint to Tehsildar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.