आरोग्य विभागाची भरती प्रकिया ‘एमपीएससी’कडूनच राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:38+5:302021-04-05T04:36:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदांची सरळ सेवेने होणारी ...

The recruitment process of the health department should be done by the MPSC | आरोग्य विभागाची भरती प्रकिया ‘एमपीएससी’कडूनच राबवावी

आरोग्य विभागाची भरती प्रकिया ‘एमपीएससी’कडूनच राबवावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदांची सरळ सेवेने होणारी भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाऐवजी ‘एमपीएससी'कडूनच राबवावी, अशी मागणी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. ‘एमपीएससी’ला डावलून स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरतीचा निर्णय चुकीचा आहे, असे आमदार डावखरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

एमपीएससी ही राज्यातील वर्ग १ व वर्ग २ या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंवैधानिक आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग १ या पदाचीही भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती ‘एमपीएससी’कडून करावी, असे आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ पदभरती आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीचा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ लक्षात घेता वर्ग १ या महत्त्वाच्या पदांसाठी पुन्हा स्वतंत्र निवड मंडळ नेमून पुन्हा घोळ घालायचा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

----------

चौकट

एमपीएससी ही घटनात्मक संस्था असताना स्वतंत्र निवड मंडळाकडून वर्ग १ च्या पदांची भरती करण्यात येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात तात्काळ भरती करायची आहे. ‘एमपीएससी’मार्फत जलद प्रक्रिया राबवून ती पदे भरता येतील. ‘एमपीएससी’कडून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल.

-निरंजन डावखरे, आमदार, भाजपा

Web Title: The recruitment process of the health department should be done by the MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.