विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

By admin | Published: April 12, 2016 01:04 AM2016-04-12T01:04:56+5:302016-04-12T01:04:56+5:30

ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत.

Recycling the water of wells | विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

Next

ठाणे : ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर भागातील आझादनगर येथे असलेल्या चार विहिरींचे पाणी आता इतर कामांसाठी वापरात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि खाजगी कंपनीने पाऊल उचलली आहेत. अशा प्रकारे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचा पहिला प्रयोग या निमित्ताने हाती घेण्यात आला आहे.
सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तर गळतीचे प्रमाण हे ४५ टक्यांच्या आसपास आहे. परंतु, धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ विहिरी वापरात आहेत. तर २१६ विहिरी वापरात नाहीत. तर पालिकेने आता शहरातील विहिरींची सफाईची मोहीम हाती घेतली असली तरी ती अद्याप सुरु झालेली नाही. परंतु, घोडबंदर भागातील प्रभाग क्र. २ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींचे पाणी इतर वापरासाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, यासाठी पावले उचलली आहेत.
यासाठी अर्पण फाऊडेंशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी बायर इंडिया कंपनीच्या मदतीने आता या चारही विहिरी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी होणार असून या चारही विहिरीत हात पोहचेल येथपर्यंत पाणी आहे. त्यानुसार आता त्यांची सफाई करुन त्यावर पाच हजार लिटरच्या आरसीसी स्वरुपाच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत.
या टाक्यांतून येथील चारही सार्वजनिक शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक टाकीच्या ठिकाणी चार नळ बसविण्यात येणार आहेत.

नालेसफाईच्या कामात जेसीबीची जलवाहिनीला धक्का
ठाणे महानगरपालिकेने वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. परंतु, ते करीत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस असलेल्या या भागाला पाण्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.
पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, ते सुरू असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील परिसराला पाणीपुरवठा करणारी ६ इंची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे वर्तकनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: Recycling the water of wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.