समुद्रातील चक्रवादळामुळे ठाणे -पालघर जिल्ह्यास ‘रेड अलर्ट’ इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 04:08 PM2019-11-04T16:08:42+5:302019-11-04T16:14:54+5:30
अरबी समुद्रामध्ये हे चक्र ीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याशिवाय पुढील तीन दिवस म्हणजे ८ नोव्हेंबर पर्यंत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चक्र ीवादळा दरम्यान पालघर, ठाणे जिल्ह्यासह तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठाणे : अरबी समुद्रात महा नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसिर्गक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे व पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले आहे. याशिवाय सोमवारी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरिन्संगद्वारे देखील मार्गदर्शन केले आहे.
अरबी समुद्रामध्ये हे चक्र ीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याशिवाय पुढील तीन दिवस म्हणजे ८ नोव्हेंबर पर्यंत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चक्र ीवादळा दरम्यान पालघर, ठाणे जिल्ह्यासह तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नैसिर्गक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किना-यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यात अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे.