ठाणे महापालिका प्रशासनाचे धनाढ्य रुग्णालयासाठी रेड कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:43 AM2019-07-18T00:43:28+5:302019-07-18T00:43:35+5:30
नेत्ररुग्णालय उभारण्यासाठी संकरा नेत्रालयास महापालिकेने जागा देऊन तेथे हे रुग्णालय सुरू करण्यासाठीची तयारीही केली होती.
ठाणे : शहरात अत्याधुनिक स्वरूपाचे नेत्ररुग्णालय उभारण्यासाठी संकरा नेत्रालयास महापालिकेने जागा देऊन तेथे हे रुग्णालय सुरू करण्यासाठीची तयारीही केली होती. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडेही पाठविला होता. परंतु, शासनाच्या अटीमुळे या संस्थेने यातून माघार घेतली आहे. असे असले तरी या संस्थेसाठी देण्यात येणारा ५० कोटींचा भूखंड आता ठाण्यातील महागड्या व्यावसायिक रुग्णालयाच्या घशात घालण्याचा विडा उचलून प्रशासनाने तसा प्रस्तावच शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यामुळे आता हा प्रस्तावही विरोध झाला तरी सत्ताधारी मात्र तो मंजूर करून घेतील, अशी चर्चाही आहे.
संकरा नेत्रालय मेडिकल रिसर्च फाउंडेशन या चेन्नईस्थित संकरा नेत्रालयाचे काम अद्वितीय असल्याने त्यांना ठाण्यातील भूखंड नाममात्र दराने देण्याचा प्रस्ताव पालिकेने सरकारला पाठवला होता. अपवादात्मक परिस्थितीत ही मागणी मान्य करून क्लॅरिअंट कंपनीच्या भूखंडावरील ११ हजार ६४३ चौरस मीटरचा भूखंड ३० वर्षांसाठी एक रुपया वार्षिक भाड्याने देण्याबाबतचा शासननिर्णय नगरविकास विभागाने १३ एप्रिल २०१८ रोजी जारी केला आहे. मात्र, ३० वर्षांनंतर भाडेपट्ट्याचे नूतनीकरण झाल्यास झाले नाही, तर
रुग्णालयासाठी उभारलेल्या इमारतीचा ताबा पालिकेकडे वर्ग करावा लागेल, अशी अट सरकारने घातली. ती व्यवहार्य नसल्याच्या मुद्यावर संकराने माघार घेतली.
>सत्ताधारी आणि प्रशासनाची हातमिळवणी?
प्रशासनाने शासनाच्या अटींचा आधार घेऊन आता नवी शाळा खेळण्याची तयारी सुरूकेली असून शासनाच्या त्याच निर्णयाचा आधार घेऊन आणि त्याच अटीशर्तींवर हा भूखंड पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या एका व्यावसायिक आणि शहरांतील सर्वात महागडी रु ग्णसेवा देणाºया रु ग्णालय व्यवस्थापनाला घशात घालण्याची तयारी चालवली आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी होणाºया महासभेत ठेवला आहे. महासभेत आता याबाबत विरोधक आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात, याकडे आता समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात हातमिळवणी केली असल्याने ते या प्रस्तावाला मंजुरी देतील किंवा
गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करतील, अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.