जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा खर्च २१३ कोटींना वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:10+5:302021-06-16T04:52:10+5:30

ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा खर्च सुधारीत आराखड्यानुसार २१३ कोटींनी वाढला आहे. यामुळे हा आराखडा त्वरित मंजूर ...

The redevelopment cost of the district hospital increased to Rs 213 crore | जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा खर्च २१३ कोटींना वाढला

जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा खर्च २१३ कोटींना वाढला

Next

ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा खर्च सुधारीत आराखड्यानुसार २१३ कोटींनी वाढला आहे. यामुळे हा आराखडा त्वरित मंजूर करून शासनाला सादर करण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

ठाणे जिल्हा रुग्णालयाचा पुनर्विकासाचा प्रश्न गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या रुग्णालयाच्या जागी सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यासाठी शिंदे गेली काही वर्षे प्रयत्नशील आहेत. नवीन पुनर्विकास प्रस्तावानुसार या रुग्णालयाची क्षमता ५५० बेड्सवरून वाढून ९०० बेड्स इतकी होणार आहे. तसेच, रुग्णालयाच्या इमारतीसोबतच नर्सिंग इमारतही प्रस्तावित आहे.

सुधारित आराखड्यानुसार अंदाजे खर्च ३१४ कोटीवरून ५२७ कोटींपर्यंत वाढला आहे. पुनर्विकासाचा सुधारित आराखडा आरोग्य विभागाला सादर झाला असून तो लवकरात लवकर मंजूर करण्याची सूचना शिंदे यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला केली. तसेच, या सुधारित आराखड्यानुसार किंमत वाढत असल्याने त्यासाठी राज्य शासनाकडून सुधारित वित्तीय मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनादेखील केली. ठाणे जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी आणि जीर्ण झाली असल्याने तिचा पुनर्विकास वेगाने करण्याची गरज आहे. या बैठकीला आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The redevelopment cost of the district hospital increased to Rs 213 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.