जुनी विहीर बुजवून नाैपाड्यात इमारतीचा पुनर्विकास; ठाणेकर रहिवाशी संतप्त!
By सुरेश लोखंडे | Published: July 9, 2023 06:26 PM2023-07-09T18:26:05+5:302023-07-09T18:26:17+5:30
नौपाडा येथील लक्ष्मी नारायण या इमारतीचे पुनर्विकासाचे काम
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एकीकडे राज्यशासनाने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पण ठाणे शहरातील विकासकांकडून जुन्या विहिरींचे जलस्रोत बुजवून त्यावर इमारती उभ्या करण्याचे गंभीरप्रकार सध्या सुरू करण्यात आले आहे. याकडे ठाणे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेसह रहिवाश्यांनी नाैपाडा येथील जुनी विहीर बूजवून काम सुरू केल्याची तक्रार महापालिकेकडे केली आहे. मात्र त्याकडे गांभीयार्ने पाहिले जात नसमुळे महापालिकेविराेधात संताप व्यक्त केला जात आहे.
नौपाडा येथील लक्ष्मी नारायण या इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू केलेले आहे. मात्र त्यासाठी जुनी विहिर बुजवून काम केले जात असल्याचे वास्तव येथील मनसेचे शाखाध्यक्ष विनायक नलावडे, करण खरे आदींसह रहिवाश्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या निदर्शनात आणून दिले. या विभागाकडून काेणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झाली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या दिरंगाई चा गैरफायदा घेऊन संपूर्ण विहीर बुजवून टाकल्याचे नलावडे यांनी स्पष्ट करून या मनमानीमुळे मनसेच्या या पदाधिकार्यांनी व रहिवाश्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिेले.
जुन्या विहिरींचे संवर्धन करून त्यातील त्यातील पाण्याची बचत ही भविष्यातील संकटा मात करणे शक्य हाेणार आहे. याकडे गांभीयार्ने लक्ष केंद्रीत करून राज्य शासनानेही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मृतावस्थेतील जलस्रोतांना पुनरुज्जीवित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यास अनुसरून नाैपाडा येथील या विहिरीच्या संवध्रनासाठी मनसे पदाधिकारी, कार्यकतेर् व रहिवाशी रस्त्यावर तरून जुना जलस्रोतांवर हाेत असलेले अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून ध्रण्याच्या तयारीत आहे.