रीमाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:53 AM2018-06-25T05:53:46+5:302018-06-25T05:53:50+5:30

बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपी रीमा ठक्करच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ठाण्याच्या

Reema's financial affairs inquiry | रीमाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

रीमाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

Next

ठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपी रीमा ठक्करच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ठाण्याच्या
गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केली आहे. दीड वर्षापासून फरार असलेल्या रीमाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.
कर चुकवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. या प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी याला पोलिसांनी एप्रिल २०१७ मध्ये अटक केली होती. अटकेपूर्वीच विदेशातील बँक खात्यांमध्ये त्याने मोठी रक्कम वळती केली. या व्यवहारांमध्ये त्याची बहीण रीमानेही मदत केली. काही दिवसांपूर्वीच शॅगी जामिनावर बाहेर पडला. त्यानंतर काही दिवसातच रीमाने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कॉल सेंटर प्रकरणात आरोपींनी कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांना आरोपींकडून गुन्ह्याची रक्कम वसूल करता आली नाही. या गुन्ह्याचा सूत्रधार शॅगी आणि त्याची बहीण बरेच महिने फरार होते.
या कालावधीत त्यांनी पैशाची विल्हेवाट लावली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी चौकशीकामी रीमाच्या बँक
खात्यांचा तपशील मागवला आहे. मात्र गुन्ह्यातून जमवलेल्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने रीतसर बँक खात्यांचा वापर केला असेल की नाही, याबाबत पोलीसही साशंक आहेत.

Web Title: Reema's financial affairs inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.