Covid 19 : गृह विलीगकरणातील रुग्णांचा अलगीकरण केंद्रात दाखल होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:54 PM2021-06-02T18:54:09+5:302021-06-02T18:55:35+5:30

राज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

Refusal home separation patients to separation center thane coronavirus pandemic maharashtra covid 19 | Covid 19 : गृह विलीगकरणातील रुग्णांचा अलगीकरण केंद्रात दाखल होण्यास नकार

Covid 19 : गृह विलीगकरणातील रुग्णांचा अलगीकरण केंद्रात दाखल होण्यास नकार

Next
ठळक मुद्देराज्य शासनाकडून १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद. रुग्णांचा अलगीकरण केंद्रात जाण्यास नकार

अजित मांडके

ठाणे  :  राज्य शासनाने १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केले आहे. त्यानंतर आता ठाणो महापालिकेने देखील गृह विलीगकरणातील रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल व्हावे अशी विनंती करीत आहेत. परंतु हे रुग्ण घरी योग्य प्रकारच्या सोई सुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही अशी विविध कारणो देऊन अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता मात्र वाढू लागली आहे.

ठाणे  महापालिका हद्दीत १ लाख २८ हजार कोरोना बाधित रुग्ण आतार्पयत आढळून आले आहेत. त्यातील १ लाख २५ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणो आढळून आलेली आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणो आढळून आलेली नाहीत. तर २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयु आणि ८१ रुग्ण हे वेटींलेटेवर असल्याचे दिसून आले आहे. तर आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून उर्वरीत नंतरचे असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

१८ जिल्ह्यांता गृह विलगीकरण बंद

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील आता गृह विलगीकरण बंद केले आहे. परंतु असे असले तरी ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, असे रुग्ण आजही घरीच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे अशी विनंती महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु हे रुग्ण जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरुम वेगळा आहे, तसेच घरच्या घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे. अशी काहीशी कारणो सांगितली जात आहेत. 

यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरच्या घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, तसेच कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधा देखील उपलब्ध आहे. परंतु अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या हाल ते होतीलच शिवाय, तेथे दिवस काढणे देखील कठीण होऊन जाणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन घरच्यांही मनात भीती निर्माण होणार आहे. अशी काहीशी कारणे दिली जात असून हे रुग्ण महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Refusal home separation patients to separation center thane coronavirus pandemic maharashtra covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.