स्थानिक तरुणांना कामावर घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:44+5:302021-07-31T04:39:44+5:30
वासिंद : जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीत स्थानिक तरुणांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने नकारात्मक भूमिका घेतल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली ...
वासिंद : जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीत स्थानिक तरुणांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने नकारात्मक भूमिका घेतल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद येथे जेएसडब्ल्यू (जिंदाल) ही नामवंत कंपनी आहे. या कंपनीचे जेटीएमएस आणि जेएसडब्ल्यू स्टील व पेंट असे दोन प्लांट असून या प्लांटचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. याठिकाणी कामगारांची भरती प्रक्रिया सुरू असून स्थानिक व परिसरातील तरुणांना रोजगारासाठी प्राधान्य न देता परप्रांतीयांना कामावर घेतले जात असल्याचा आराेप स्थानिकांकडून केला जात आहे. जेएसडब्ल्यू (जिंदाल) या कंपनीत सध्या ७०० ते ८०० कायमस्वरूपी, तर ६०० ते ७०० पर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगार काम करत असून यासाठी जवळजवळ १७ ठेकेदार आहेत. यामध्ये फक्त २०० ते २५० च्या आसपास स्थानिक कामगार आहेत.