पाणीटंचाई निवारणासाठी पक्षभेद विसरून एकत्र या, आव्हाडांची पालकमंत्र्यांसह आमदारांना साद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:12 AM2019-06-26T01:12:48+5:302019-06-26T01:13:16+5:30

ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Regarding separation of water shortage from time to time | पाणीटंचाई निवारणासाठी पक्षभेद विसरून एकत्र या, आव्हाडांची पालकमंत्र्यांसह आमदारांना साद

पाणीटंचाई निवारणासाठी पक्षभेद विसरून एकत्र या, आव्हाडांची पालकमंत्र्यांसह आमदारांना साद

googlenewsNext

ठाणे - ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षभिनिवेश बाजूला सारून ठाण्यासाठी मंजूर झालेले शाई धरण मार्गी लावूया अशी साद राष्टÑवादीचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील इतर तिन्ही आमदारांना घातली आहे. त्यामुळे आता किती आमदार त्यांच्या या हाकेला ओ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या संदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर आणि सुभाष भोईर यांना एक पत्र लिहिले असून त्याच्या माध्यमातून ही साद घातली आहे. ठाण्यात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हिरानंदानी मेडोजसारख्या सर्वात महागड्या गृहसंकुलांनासुद्धा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आज घोडबंदरचा पट्टा हा पाण्यावाचून त्रस्त आहे. जी परिस्थिती घोडबंदरला आहे तीच परिस्थिती दिवा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट पाणीजोडणी घेऊन दादागिरी करून काही विभागामध्ये पाणी दिले जाते. परंतु, या सगळ्याचा परिणाम हा पाणीवितरणावर होतो आणि अख्ख्या ठाणेकरांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत.

पाणीवितरणात ३५ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही

गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये पाणीवितरणाबाबत धाडसाने महानगरपालिकेने काम केले असे काहीच दिसत नाही. पण, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपले स्वतंत्र स्त्रोत्र नसल्यामुळे एमआयडीसीमध्ये होणारे शटडाऊन आणि स्टेमचा होणारा शटडाऊन यामुळे अनेकवेळा ४-४ दिवस विविध भागांमध्ये पाणी नसल्याचे आढळून आले आहे. खरतर आतापर्यंत आपण आपले स्वत:च स्त्रोत्र म्हणजेच एक धरण उभे करायला हवे होते. पण, दुर्देवाने ते घडू शकले नसल्याची खंतही त्यांनी यात व्यक्त केली आहे. परंतु, यामध्ये आता कुठल्या पक्षाला दोष मात्र त्यांनी दिलेला नाही. सध्याची ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज ही परिस्थिती पाहता आणि गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता पावसाळाही हळूहळू पुढे सरकत चालला आहे. पूर्वी जूनच्या ७ तारखेला येणारा पाऊस आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरूहोत आहे. उन्हाळा जो पहिला एप्रिल मध्ये सुरु व्हायचा तो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये सुरू होतो. त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे. त्यामुळे येणाºया काळात आपल्याला अधिक पाणीतुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र धरण असणे फार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि शासनाची मदत घेऊन जे शाई धरण २००३ साली मंजूर केले होते. त्या धरणाबाबत अंतिम भूमिका घेऊन त्याच्या बांधकामाला सुरुवात करूया अशी साद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून घातली आहे. राजकारण बाजूला ठेवूयात आणि आपल्या ठाण्याचा पाणी प्रश्न हा कायमचा सोडवूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Regarding separation of water shortage from time to time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.