जनजागृती रॅलीत अवयव दानासाठी ठाण्यातील ४० जणांकडून नाव नोंदणी

By सुरेश लोखंडे | Published: January 15, 2023 07:40 PM2023-01-15T19:40:18+5:302023-01-15T19:40:41+5:30

३३ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे यासाठी ही रँली काढण्यात आली.

Registration of 40 people from Thane for organ donation in awareness rally | जनजागृती रॅलीत अवयव दानासाठी ठाण्यातील ४० जणांकडून नाव नोंदणी

जनजागृती रॅलीत अवयव दानासाठी ठाण्यातील ४० जणांकडून नाव नोंदणी

googlenewsNext

ठाणे : अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे म्हणून जागरूकता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन  आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांने मोटार सायकल रॅली आयोजित केली आणि अवयव दानाचा संदेश दिला. यावेळी अवयवदानाची प्रतिज्ञा घेत ४० दात्यांनी अवयव दान करण्यासाठी नाव नोंदणी केली. 

रॅली लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय  येथून सुरुवात होवून पोखरण रोड नंबर- २ मार्गे पलाई देवी मंदिर, उपवन ठाणे येथे सांगता झाली. समारोप कार्यक्रमात अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करून त्यांना युनिक रजिस्ट्रेशन नंबरचे डोनर कार्ड वाटप करण्यात आले. सर्व सहभागी होणाऱ्याना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या रँलीत या रॅलीत अडीचशेहुन अधिक विद्यार्थी, बाईकर रँलीत सहभाग घेतला. ३३ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे यासाठी ही रँली काढण्यात आली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज, पिक्सन फोटोग्राफी कंपनी, बोरिवली मेडिकल ब्रदरहुड असोसिएशन, युवान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, सेवानिवृत्त सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट् गवर्नर कैलास जेठानी, रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजचे अध्यक्ष अमित गवस, सेक्रेटरी रेणुका साळवी, लेखा अधिकारी अपर्णा पाटणे, पिक्सनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित श्रीवास्तव, युवानचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील मराठे,  डॉ. राजेश पांचाल, राजेश सोळंकी व जयश्री सोळंकी आदी उपस्थित होते. या  रँलीत ज्ञानसाधना, ज्ञानगंगा या कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

रस्त्यावरील अपघातात जखमी व्यक्तींना अवयव दानाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने अवयवदानाचे महत्त्व आपल्या समाजात नसल्यामुळे अनेकजण वंचित राहतात. या वंचितांना अवयव प्राप्त झाल्यास त्यांना पुन्हा नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. आपण नेत्रदान व शरीरातील पेशींचे दान देखील करु शकतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ५० जीव वाचवू शकतो. जीवन मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर असणा-या आजारी व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी आपले अवयवदान हे जीवनदायी ठरु शकते, असा सूर यावेळी ऐकायला मिळाला.

Web Title: Registration of 40 people from Thane for organ donation in awareness rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे