वादग्रस्त अधिकाऱ्यांची बदली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:28 AM2018-06-02T01:28:55+5:302018-06-02T01:28:55+5:30
शहरातील बेकायदा बांधकामे, फाईल चोरी, जनसंपर्क अधिकारी कार्यालयाची झाडाझडती सापडलेले घबाड आदी
उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामे, फाईल चोरी, जनसंपर्क अधिकारी कार्यालयाची झाडाझडती सापडलेले घबाड आदी प्रकरणाने महापालिकेतील सावळागोंधळ उघड झाला. यावर उपाय म्हणून मुकादम, शिपाई, वादग्रस्त प्रभाग अधिकारी यांच्या बदल्या होणार असून त्याच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली असल्याचा दुजोरा उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिला आहे.
उल्हासनगर महापालिका सावळागोंधळाचे ठिकाण झाले असून दररोज एकतरी वादग्रस्त प्रकरण बाहेर येत आहे. आयुक्त गणेश पाटील यांच्या प्रशिक्षणाच्या काळात शहरात शेकडो बेकायदा बांधकामे उभी राहिली. यामध्ये अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली विनापरवाना बेकायदा बहुमजली बांधकामे उभी राहिली आहेत. पाटील यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्यांनी कारवाईचा दंडुका उगारला
आहे.
त्यापूर्वी मुकादमासह कनिष्ठ कर्मचारी, वादग्रस्त प्रभाग अधिकारी यांच्या बदलीचे संकेत दिले. देहरकर यांनी मुकादमांसह अन्य कर्मचाºयांना शुक्रवारी दुपारी बोलावून घेतले. मात्र तीन ते चार तास थांबल्यानंतरही उपायुक्तांचे बोलावणे आले नाही. अखेर मुकादमांसह अन्य कर्मचाºयांनी घरी जाण्यासाठी महापालिकेतून काढता पाय घेतला.
नालेसफाईची पाहणी, रस्त्याची दुरवस्था, साफसफाई आदींचा दौरा करून आढावा घेतला असून नालेसफाईचे काम वेगात सुरू ठेवण्याचे सुचवले आहे. तसेच रस्त्याची पाहणी करून पावसाळयापूर्वी खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत.