शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:59 AM2019-11-12T00:59:28+5:302019-11-12T00:59:31+5:30
डिम्पल रुग्णालयात एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
म्हारळ : येथील डिम्पल रुग्णालयात एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयास घेराव घालून संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उल्हासनगरातील हनुमाननगरात राहणाऱ्या ५0 वर्षीय विमला पाठक यांना म्हारळ येथील राधाकृष्णनगरी येथील डॉक्टर नागपाल यांच्या डिम्पल रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटात गाठ असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. दुसºया दिवशी, रविवारी दुपारी डॉक्टर नागपाल यांनी पाठक यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु, सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान प्रकृती अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात घेराव घालून रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टर नागपाल जबाबदार असल्याचा आरोप केला. नातेवाइकांचा गोंधळ सुरू असताना, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. परंतु, तिथे न्याय मिळणार नसल्याचा आरोप करत, नातेवाइकांनी मृतदेह मुंबई येथील जे.जे. रु ग्णालयात पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार, महिलेचे शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करण्यात आले. म्हारळ पोलीस चौकीचे उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांनी दिल्यानुसार, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे आरोग्य विभागासह जे.जे. रु ग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
विमला पाठक यांच्यावर बिर्ला गेट येथील सेंच्युरी रु ग्णालयात डॉक्टर मोरनकर यांच्याकडेही उपचार सुरू होते. पाठक यांचे पुत्र अमित यांनी सांगितले की, डॉक्टर नागपाल हेदेखील तेथे कार्यरत असल्याने त्यांनी त्यांच्या म्हारळ येथील डिम्पल रु ग्णालयात कमी खर्चात शस्त्रक्रिया करू, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्यासाठी सहमती दर्शवली होती, असे अमित यांनी सांगितले. यासंदर्भात डॉक्टर नागपाल यांच्या पत्नी ज्योती नागपाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रि या देण्यास नकार दिला.
>हॉस्पिटलमध्ये जीवनावश्यक सुविधाच नसून, आईचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा अमित यांनी केला. हॉस्पिटलचे फुटेज तपासून, दोषींवर कारवाईची मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली.