उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:17 PM2021-09-05T15:17:01+5:302021-09-05T15:19:20+5:30

Ulhasnagar News : एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृत झालेल्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर गेली.

Relatives of those killed in Ulhasnagar building accident await help | उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर -  शहरातील मोहिनी पॅलेस व साई पॅलेस इमारतीचा स्लॅब पडून मृत झालेल्यांचा नातेवाईकांना घटनेला ४ महिने उलटूनही आर्थिक मदत मिळाली नसल्याने, नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी होत आहे. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून ४ महिन्यांपूर्वी मोहिनी व साई पॅलेस इमारतीचे स्लॅब पडून १२ जनाचें बळी गेले. याप्रकारने शहरातील धोकादायक व अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला. 

पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृत झालेल्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर गेली. दरम्यान धोकादायक व अवैध इमारतीवर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करून, समिती १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र अध्यापही कोणताही दिलासादायक निर्णय झाला नाही. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत अद्यापही मिळाली नसल्याने, शिवसेना आघाडी सरकारवर टीका होत आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरीचा उपाय म्हणून, १० वर्ष जुन्या इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा पाठविल्या. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच स्ट्रॅक्टरल ऑडिटसाठी एक समितीची स्थापना करून, धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट सुरू केले. अतिधोकादायक इमारती निष्कसित करण्याची कारवाई सुरू केली. एकूणच अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न टांगणीला लागला असून शासनाने वेळीच योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे शहरहिताचा निर्णय घेतील. असा विश्वास सर्वपक्षीय नेते व नागरिक व्यक्त करीत आहेत. 

मृतांच्या नातेवाईकांना लवकरच मदत - चौधरी 

शहरात यापूर्वी इमारत दुर्घटनेत मृत झालेल्या नातेवाईकांना महापालिकेने आर्थिक मदत केली. यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच मदत मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.
 

Web Title: Relatives of those killed in Ulhasnagar building accident await help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.