निवांत गप्पा... आणि विश्रांती

By Admin | Published: February 23, 2017 05:57 AM2017-02-23T05:57:11+5:302017-02-23T05:57:11+5:30

प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदानाचा ताणही ओसरला. त्यानंतर ठाण्यातील नेत्यांनी

Relaxed chat ... and rest | निवांत गप्पा... आणि विश्रांती

निवांत गप्पा... आणि विश्रांती

googlenewsNext

ठाणे : प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदानाचा ताणही ओसरला. त्यानंतर ठाण्यातील नेत्यांनी मतमोजणीपूर्वीचा दिवस कुटुंबासोबत, कार्यकर्त्यांसोबत, प्रसंगी विश्रांती घेत कारणी लावला... नंतरच्या राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीसाठी. क्षणभर विश्रांती घेत ताजेतवाने होण्यासाठी...
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दिवस कुटुंबासोबत घालवला. तशीच स्थिती होती शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची. तेही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वेचण्यात रमले होते. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत त्यांच्याकडून ऊर्जा मिळवली. भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी कुटुंबासोबत रमत टवटवीत होण्याचा आनंद लुटला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या धावपळीतही कोकण गाठले. कुलदेवतेचे दर्शन घेतले आणि पुन्हा संध्याकाळी ठाणे गाठत पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांनीही पक्ष कार्यालयात हजेरी लावत निकालाबद्दल कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. मतमोजणीवळी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेचा अंदाज घेतला.
एकनाथ शिंदे यांनीही घरबसल्या बरेच काम केले. पण कुटुंबासोबत निवांतपणा अनुभवला. एरव्ही पहाटेपर्यंत सुरू असलेला त्यांचा दिवस प्रचाराच्या काळात, मतदानाच्या दिवशी उसंत न देणारा होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यही भलतेच खूश होते.
प्रचार आणि मतदान जरी संपले असले, तरी निवांतपणा नसतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी सकाळी सर्वप्रथम पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही ताणतणाव असो, पवार यांची भेट घेतल्यानंतर तो बराच कमी होतो. त्यामुळे सकाळीच साहेबांना भेटलो. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या एकंदर राजकीय घडामोडी आणि परिस्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. मध्यावधी निवडणुकांची तयारी करायची का, अशी विचारणा आपण साहेबांना केल्याचेही ते म्हणाले. पण त्यावरील साहेबांचे उत्तर मात्र विचारू नका, असे सांगायलाही ते विसरले नाही.
एकीकडे प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची विश्रांती सुरू असताना वेगवेगळ््या पक्षांची कार्यालये दिवसभर तशी निवांतच होती. नेत्यांनीही संध्याकाळी हजेरी लावल्याने बहुतेक कार्यकर्त्यांनी आपलाही दिवस विश्रांतीतच घालवला. त्यानंतर मात्र रंगली ती निकालाबाबतचा अंदाज व्यक्त करण्याची स्पर्धा. मतदानाचे प्रभागनिहाय नेमके आकडे हाती आल्याने कोणत्या परिसरात कोणाला किती जागा मिळतील, याचे आडाखे बांधले जात होते. कोण कुठे गेल्याने कुणाला फायदा होईल, कुणामुले कुणाला तोटा होईल... मतांची गणिते कशी बदलतील याचे अंदाज व्यक्त केले जात होते आणि त्या आधारे ठाण्याचे राजकीय चित्र कसे असेल, याचेही. मुंबईवर ठाण्याची समीकरणे अवलंबून असतील की ठाण्याला स्वतंत्र राजकीय निर्णयाची मुभा मिळेल हाही अर्थातच चर्चेचा प्रमुख विषय होता. (प्रतिनिधी)

तयारी मतमोजणीची
प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात उत्सुकता होती ती निकालाची. मुंबईत आणि ठाण्यात राजकीय चित्र असे असेल याची.
निकालानंतरची ठाण्याची समीकरणे कशी असतील, ती मुंबईवर अवलंबून असतील का याचीही चर्चा नेते, कार्यकर्त्यांत रंगली होती.

Web Title: Relaxed chat ... and rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.