अंबरनाथ येथील ‘सूर्योदय’ला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:08 AM2018-12-25T03:08:42+5:302018-12-25T03:09:00+5:30
अंबरनाथ येथील सूर्योदय सोसायटीमधील सदनिका नियमानुकूल करण्यासाठी सर्वसामान्य सदनिकाधारकांना किमान पाच हजार ते कमाल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला जाणार नाही.
अंबरनाथ : अंबरनाथ येथील सूर्योदय सोसायटीमधील सदनिका नियमानुकूल करण्यासाठी सर्वसामान्य सदनिकाधारकांना किमान पाच हजार ते कमाल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला जाणार नाही. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या बैठकीत हा मुद्दा स्पष्ट केल्याने अंबरनाथमधील सर्वाधिक जुन्या आणि मोठ्या सोसायटीचा दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला भूखंडाचा वाद निकालात निघाल्यासारखा आहे.
अंबरनाथ येथील सर्वात जुन्या सूर्योदय सोसायटीमध्ये निवासी प्रयोजनार्थ देण्यात आलेल्या भूखंडाचा शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी सूर्योदय सभागृहात एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार संभाजी शेलार, सूर्योदय सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी, सरचिटणीस नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष विजय पवार, लीलाधर पाटील, विष्णू पाटील यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोसायटीची जागा वादाच्या भोवºयात सापडल्याने २००५ सालापासून येथील खरेदी विक्र ी व हस्तांतरण प्रक्रि या बंद आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सोसायटीच्या सदस्यांनी वारंवार हा प्रश्न शासनदरबारी मांडला. याबाबत विधानसभेमध्येही मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रश्नावर शासनदरबारी अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच होता. सततच्या पाठपुराव्यानंतर या सोसायटीतील सदनिका नियमानुकूल करण्याचा निर्णय झाल्यानंतर, त्यासाठी दंड आकारणी किती केली जाणार आहे, याबाबत संभ्रम होता. सोसायटीतील रहिवाशांचे गैरसमज दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याचे आमदार किणीकर म्हणाले.
अधिकाºयांनी केले रहिवाशांचे गैरसमज दूर
सदनिका नियमानुकूल करताना लाखो रु पये भरावे लागतील, असा गैरसमज निर्माण झाला होता. हा गैरसमज यावेळी अधिकाºयांच्या समक्ष दूर करण्यात आला. नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी सदनिकांना कसा व किती दंड आकारला जाईल, हे आकडेवारीसह समजावून सांगितले.
त्यानुसार रहिवाशांना किमान पाच हजार तर कमाल ५0 हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांचे समाधान झाले.
शेवटच्या सदनिकाधारकाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केल्याने सूर्योदय सोसायटीच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे