अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:12 AM2017-10-10T02:12:28+5:302017-10-10T02:12:42+5:30

थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.

The release of the kidnapping business, seven people detained: Rs 11 lakh refund issue | अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा

अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा

Next

मीरा रोड : थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. या व्यापाºयाची तब्बल नऊ दिवसांनी सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
भार्इंदर पश्चिमेस दीडशे फूट मार्गावरील श्रीसाई टॉवरमध्ये जितेंद्र रामेश्वर जोशी (३२) हे कापड व्यापारी राहतात. ते भिवंडीतील कापड व्यापारी गजानन राघू हरड (३२, रा. सोनाळे) यांच्याकडून जीन्स पॅन्टची खरेदी करत. गेल्या आठ महिन्यांपासूनचे मालाचे ११ लाख रुपये जितेंद्र देत नव्हता. तो पैसे देत नसल्याने दोघांत वाद होत होते.
आई व भाऊ जोधपूरला जाणार म्हणून बोरिवलीला त्यांना टॅक्सीने पाठवण्यासाठी टॅक्सी आणण्यासाठी २९ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास जितेंद्र घरातून उतरून खाली गेले होते. तेव्हा झायलो गाडीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी जितेंद्र याला मारहाण करत बळजबरीने गाडीत टाकून त्यांचे अपहरण केले.
या प्रकरणी जितेंद्रच्या आईने भार्इंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अपहरण प्रकरणी तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे, अभिजीत टेलर यांच्यासह वेळे, वाडिले, ढेमरे, जाधव, पोशिरकर, पंडित, गर्जे, थापा, श्रीवास्तव आदींचे विशेष पथक नियुक्त केले होते.
या पथकाच्या तपासात जितेंद्रचे अपहरण भिवंडीच्या हरड याने घडवून आणल्याचे समोर आले. मधल्या काळात जितेंद्रचा आईला फोन आला होता व आपण सुखरुप असल्याचे त्याने सांगितले होते. त्याचे अपहरण पैशांच्या थकबाकीवरुन झाल्याची खात्री पोलीस पथकाला पटल्याने त्यांनी कसून तपास सुरु केला. त्यातच जितेंद्रच्या जवळ राहणारा वरुण दिलीप अग्रवाल (३२, रा. रेनुजा रामदेव, दीडशे फुट मार्ग, भार्इंदर) याने अपहरणकर्त्यांना आवश्यक माहिती पुरवल्याचे समोर आले.
जितेंद्र याला सोनाळे गावातील एका बंद गोदामात कोंडून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून अपहरणकर्त्यांना अटक केली आणि त्याची सुटका केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी गजानन हरड व वरुण अग्रवालसह रमेश उर्फ अनिल यादव (३८, रा. सोनाळे), अवधुत सुनील शेलार (२७), मयुरेश सुनील म्हात्रे (२८), यतीन महादेव देसाई (२८), प्रथमेश हरिश्चंद्र वालावलकर (२७, सर्व रा. लोढा हेरिटेज, डोंबिवली पूर्व) यांना अटक केली. हरडचा भाचा दिप्तेश नाईक (रा. लोढा हेरिटेज, डोंबिवली) हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

Web Title: The release of the kidnapping business, seven people detained: Rs 11 lakh refund issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.