इमारतीच्या ग्रिलमध्ये अडकलेल्या कबूतराची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 20:42 IST2021-09-30T20:41:54+5:302021-09-30T20:42:20+5:30
Release of pigeon : ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाची तत्परता

इमारतीच्या ग्रिलमध्ये अडकलेल्या कबूतराची सुटका
ठाणे : कळवा, खारेगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ग्रिलमध्ये अडकलेल्या कबूतराची ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी सुटका केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या कबूतराला पुढील उपचारासाठी ब्रम्हांड येथील एका खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
खारेगाव येथील ९० फूटी रोडजवळील बाली रेसिडेन्सी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील इमारतीमध्ये हे कबूतर अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या कक्षातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठया कौशल्याने या कबूतराची सुटका केली. त्याच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर ब्रम्हांड येथील एसपीसीए या पशुचिकित्सालयात उपचार करण्यात येत आहे.