रिलायन्स जिओने भरला ११ कोटींचा मालमत्ता कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:39+5:302021-09-18T04:43:39+5:30
कल्याण : रिलायन्स जिओ कंपनीने मोबाइल टॉवर मालमत्ता करापोटीची ११ कोटी रुपयांची रक्कम कल्याण-डोंबिवली महापालिकेत जमा केली आहे. रिलायन्स ...
कल्याण : रिलायन्स जिओ कंपनीने मोबाइल टॉवर मालमत्ता करापोटीची ११ कोटी रुपयांची रक्कम कल्याण-डोंबिवली महापालिकेत जमा केली आहे. रिलायन्स जिओचे व्यवस्थापक धनाकर्ष यांनी ही रक्कम जमा केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त विनय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत ही रक्कम सुपुर्द करण्यात आली.
मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरणाऱ्या करदात्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट दिली जात आहे. या मोहिमेस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत नागरिकांनी १६० कोटी ६४ लाख रुपयांचा मालमत्ता कराची वसुली केली आहे. गतवर्षी याच कालावधीत ११० कोटी २२ लाख रुपये मालमत्ता कर महापालिकेने वसूल केला होता. मालमत्ता कराच्या वसुलीचा धडाका यापुढेही सुरू ठेवला जाणार असून, सर्व करदात्यांना आवाहन करण्यात आले आहे की, मालमत्ता कर विहित वेळेत जमा करून महापालिकेस सहकार्य करावे तसेच जप्तीची कारवाई टाळावी.
--------------------------