काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:40 PM2020-04-09T15:40:57+5:302020-04-09T15:42:38+5:30

मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालय सील करण्यात आल्याने येथे डायलेसीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार होते. मात्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेबरोबर चर्चा करुन या रुग्णांचा प्रश्न मार्गी लावला आहे.

Relief in dialysis patients at Kalsaker Hospital | काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

Next

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव उपाय असून सर्वत्र याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रु गणालयात संशयित व कोरोनाबाधीत रु गण सापडल्याने अशी रु गणालये सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहे, यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रु ग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रु ग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रु गणांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
                मुंब्रा येथील काळसेकर रु ग्णालयात दररोज ५० हून अधिक रु ग्णांचे डायलेसीस होत होते, मात्र, सद्यस्थीतीत हे रु गणालय बंद असल्यामुळे डायलेसीस होणार की नाही तसेच सध्या कोरोनामुळे देखील रु ग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या रु गणालयात उपचार घेणारे रु ग्ण हे गरीब व गरजू असल्यामुळे त्यांना इतर रु ग्णालयात उपचार घेणे आर्थीकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे रु गणांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब खासदार शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, परिमंडळ १ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त संदीप माळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरु ध्द माळगांवकर, कोविड प्रतिबंधसाठी नेमण्यात आलेले विशेष क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे उपस्थीत होते.
                   बैठकीमध्ये मुंब्रा येथील काळसेकर रु गणालयात डायलेसीस उपचार घेत असलेल्या रु ग्णांची गैरसोय होवू नये त्यांची पर्यायी व्यवस्था ठाण्यातील महापालिकेचे वाडिया हॉस्पीटल, कोपरी येथील लखीमचंद फतिमचंद रु गणालय तसेच हाजुरी येथील जितो रु ग्णालय येथे करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. याबाबत काळसेकर रु ग्णालयातून डायलेसीससाठी असलेल्या रु ग्णांची यादी मागविण्यात आली असून त्यानुसार दररोज महापालिकेच्या आरोग्य विभागातून या रु गणांशी संपर्क साधून त्यांना डायलेसीस केले जाणार आहे, यासाठी महापालिकेच्यावतीने रु ग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या रु ग्णाला घरापासून थेट रु ग्णालयात नेले जाणार आहे व डायलेसीस नंतर पुन्हा घरी सोडले जाणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे काळसेकर रु गणालयात सध्या उपचार घेत असलेल्या डायलेसीस रु ग्णांनी घाबरु न न जाता महापालिकेने सुरू केलेल्या उपक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केले आहे.
 

 

Web Title: Relief in dialysis patients at Kalsaker Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.