ठाण्यातीलव वाचक कट्टयावर नौपाडा परिसरातील माधव जोशी यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:53 PM2018-10-13T15:53:17+5:302018-10-13T15:56:59+5:30

माधव जोशी उर्फ अप्पा यांच्या स्मरणार्थ ठाण्यातील वाचक कट्टयावर "स्व.माधव जोशी यांचा जीवन प्रवास" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Remembering the memories of Madhav Joshi in Naipada area of ​​Thane, reader Kattya | ठाण्यातीलव वाचक कट्टयावर नौपाडा परिसरातील माधव जोशी यांच्या आठवणींना उजाळा

ठाण्यातीलव वाचक कट्टयावर नौपाडा परिसरातील माधव जोशी यांच्या आठवणींना उजाळा

googlenewsNext
ठळक मुद्देमाधव जोशी यांच्या आठवणींना उजाळाअप्पांबद्दल बोलताना त्यांचे कुटुंबिय झाले भावुक लहानपणापासूनच आम्हाला अप्पांचे मार्गदर्शन - किरण नाकती

ठाणे : ठाण्यातील वाचक कट्टयावर "स्व.माधव जोशी यांचा जीवन प्रवास" या कार्यक्रमात त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला. वेळी अप्पांच्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देण्यात आला. अप्पांबद्दल बोलताना त्यांचे कुटुंबिय भावुक झाले होते.

     आपल्या ९२ वर्षाच्या प्रवासात अप्पांनी अनेक समस्यांना तोंड दिले.ताठ कणा हाच बाणा या वृत्तीचे ते होते.१९४५ मध्ये अप्पा रेल्वेत नौकरीला लागले.१९५० साली त्यांचा विवाह झाला,सुरवातीचे काही काळ ते गिरगावात होते.नंतर ते ठाण्यात वास्तव्यास आले.१९५५ मध्ये दातार न्युज एजन्सी येथे ते कामाला लागले.सकाळी ४.३० वा उठून ते पेपर वाटायचे,त्यानंतर ९.३० वाजता घरी यायचे मग जेवणाचा डबा घेऊन १०.३० ते ०५ या वेळेत रेल्वेत नौकरी करायचे असा त्यांचा दिनक्रम होता.पुढे अप्पांनी स्वतःचा पेपर व्यवसाय सुरु केला व त्यांची परिस्तिथी बदलली.त्यांच्या पश्चात त्यांना ३ मुली व १ मुलगा आहे.  अप्पा वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर होते. ते नेहमी वेळेत जेवण करत व वेळेतच झोपत होते.मला कोणतीही अडचण आली की मला अप्पा मदत करायचे. वयाच्या अगदी ९४व्या वर्षी सुद्धा ते कसे रुबाबदारपणे चालतात याचं मला कौतुक वाटायचं असे अप्पाच्या शेजाऱ्यांनी सांगितले.  अप्पांना वाचनाची खूप आवड होती.मी इतकी मोठे झाले तरी त्यांच्या जवळ जाऊन गोष्टी ऐकायची असे अप्पांच्या नातीने सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन करताना डॉ.मौसमी घाणेकर यांनी अप्पा आपल्या वाडीलांप्रमाणे आहेत आणि त्यांची आठवण सदैव मनात घर करुन राहील अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. माधव जोशी यांच्या जीवनप्रवासाचे वाचन वाचक कट्टयावर करण्यात आले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अप्पांच्या पत्नी विजया जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी कट्ट्याचे कलाकार सहदेव कोळंबकर, उत्तम ठाकूर, ओमकार मराठे, माधुरी कोळी, शुभांगी भालेकर, रोहिणी राठोड, वाकडे यांनी अभिवाचन केले. अमित महाजन याने चमचा हि एकपात्री सादर केली. यावेळी अप्पांच्या कुटुंबातील सदस्य सुगंधा ताम्हणकर, शरद मोघे, दिलीप दामले, उषा दामले, सुधीर काणेकर, सविता जोशी, तेजश्री जोशी तसेच माजी नगरसेवक भास्कर पाटील यांनी अप्पांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. अगदी लहानपणापासूनच आम्हाला अप्पांचे मार्गदर्शन व्हायचे.ते एक उत्तम वाचक होते शिवाय भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.

Web Title: Remembering the memories of Madhav Joshi in Naipada area of ​​Thane, reader Kattya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.