हजरत हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:45 AM2018-09-15T02:45:12+5:302018-09-15T02:45:14+5:30

मोहरमच्या इतिहासाची कथा : मूठभर नागरिकांचा हुकूमशहाविरोधातील संग्राम

Remembrance of the sacrifice of Hazrat Hussain | हजरत हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण

हजरत हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण

googlenewsNext

- हुसेन मेमन

जव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे एक ऐतिहासिक युध्द झाले. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष) पहिला महिना म्हणजे मोहरम होय. या महिन्याच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खिलफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी शाहिद केले तो दिवस म्हणजे यौमे आशुरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.
करबलामध्ये एका बाजूला हजरत हुसेन यांच्यासोबत केवळ ७२ तर दूसऱ्या बाजुला यजिद यांचे तब्बल ४० हजार सैनिक होते. ७२ जणांमध्ये महिला-पुरूष व ५१ मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुसºया बाजूला यजिद यांच्या सैन्याचे नेतृत्व उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धमार्चे पाचवे खिलफा अमीर मुआविया यांनी खिलफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. तो त्या काळी गुंड म्हणून कुप्रसिध्द होता. समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली होती. त्यामुळे त्याकाळच्या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खिलफा झाल्याचे रूचले नाही. यजिदने समाजाविरूध्द बंड केले. पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आवाहन होते कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खिलफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले.
हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहिद झाले. पण पराक्र मी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही. युद्धभूमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन नमाज साठी ्झुकले असताना यजीदच्या (पान २ वर)

Web Title: Remembrance of the sacrifice of Hazrat Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.