माणकोली प्रकल्प, रिंग रोडमधील अडचणी 2 महिन्यांत दूर करा, MMRDA अधिका-यांना राज्यमंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:11 PM2018-10-16T18:11:40+5:302018-10-16T18:38:50+5:30

कल्याण, डोंबिवली शहरांना वेगवान करणारा माणकोली प्रकल्प आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांमधील अडचणी, अडथळे तातडीने दूर करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी आयुक्त गोविंद बोडकेंना दिले.

Removal of problems in the Mankoli project, ring road, in two months, to the MMRDA officials | माणकोली प्रकल्प, रिंग रोडमधील अडचणी 2 महिन्यांत दूर करा, MMRDA अधिका-यांना राज्यमंत्र्यांची सूचना

माणकोली प्रकल्प, रिंग रोडमधील अडचणी 2 महिन्यांत दूर करा, MMRDA अधिका-यांना राज्यमंत्र्यांची सूचना

Next

डोंबिवली: कल्याण, डोंबिवली शहरांना वेगवान करणारा माणकोली प्रकल्प आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांमधील अडचणी, अडथळे तातडीने दूर करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी आयुक्त गोविंद बोडकेंना दिले. मंगळवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मॅरेथॉन बैठकीत त्या प्रकल्पांसह स्मार्ट सिटी, मेट्रो, दुर्गाडी पूल आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.

राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वेळकाढू पण होत असलेल्या या प्रकल्पांमुळे शहरांतर्गत विकासकामांना खीळ बसू नये यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्याला एमएमआरडी, महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सगळ्यांसमोर महापालिका आयुक्तांना, शहर अभियंत्यांना त्यांना भेडसावणा-या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी दोन महिन्यांत जमीन हस्तांतरणासह विविध अडथळयांवर तोगडा काढून प्रकल्प कामांना गती देण्याचे सांगण्यात आले.

दुर्गाडीजवळील पुलाचे काम बंद असून ते तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे, नव्याने टेंडर द्यावे, आणि काम तात्काळ सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण राज्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला देण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्मार्ट सिटीअंतर्गत जो निधी आला आहे, त्या निधीचा उपयोग करून प्रकल्प अंमलबजावणीला तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्या प्रकल्पाचे काम आयुक्त बोडके यांनी तातडीने सुरू करावा, असे तात्काळ आदेशीत करण्यात आले. तसेच मेट्रो प्रकल्पांतर्गत तरतूद करण्यात येत असलेल्या निधीच्या माध्यमातून ४५ मीटरचे रस्ते तयार करणे यासह अन्य तांत्रिक कामांनाही वेळ न दवडता सुरुवात करावी, असेही सांगण्यात आले.

कल्याण-शीळ मार्गावरील शीळ जंक्शन येथून जाणा-या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असून, तेही तातडीने सुरू करण्यात यावे. त्या कामामध्ये ज्या अडचणी असतील त्या तातडीने संबंधित विभागांनी सोडवाव्यात. तसेच काही समस्या असतील तर मंत्रालय, एमएमआरडीए विभागाकडून त्या सोडावाव्यात असेही सांगण्यात आले. भोपर,माणगाव आदी गावामधील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, तेथील नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच त्या ठिकाणी नवी पाण्याची पाइप लाइन टाकावी असेही सांगण्यात आले. ग्रोथ सेंटर करण्यासाठी प्रत्यक्ष कामाची गती दिसू द्या, कागदावर प्रकल्प नकोत असेही ते म्हणाले. कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वरील प्रकल्पांना गती देणे, ते वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Removal of problems in the Mankoli project, ring road, in two months, to the MMRDA officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.