भराव काढून कांदळवनाची लागवड करा; भराव टाकणाऱ्यांकडून खर्च घ्या: सुदाम परदेशी
By सुरेश लोखंडे | Published: December 5, 2023 07:08 PM2023-12-05T19:08:11+5:302023-12-05T19:08:32+5:30
उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले.
सुरेश लोखंडे, ठाणे : भराव टाकून कांदळवन संपुष्ठात आणलेल्या ठिकाणांवरील भराव तात्काळ काढून त्या जागी पुन्हा कांदळवनाची लागवड करा, भराव काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आंदाजपत्रक तयार करा, विकासक किंवा अन्य व्यक्तींने भराव टाकून कांदळवन नष्ठ केलेले असल्यास त्याच्याकडून भराव काढण्याचा खर्च वसूल करा. त्या जागी पुन्हा कांदळवनाची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्याची आढावा बैठक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महापालिकांसह कांदळवन संवर्धन विभाग, वन विभाग आदींचे अधिकारी, कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. तालुका पातळीवरील कांदळवन संवर्धन समित्या सक्रीय करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. पाेलिसांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी निकाली काढा, महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा अहवाल तयार करा. पाण्याच्या ठिकाणी कांदळवनाची लगवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे मार्गदर्शनही परदेशी यांनी यावेळी केले. भराव टाकून कांदळवन नष्ठ करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कांदळवनाची संवर्धन करण्यासाठी यावेळी परदेशी यांनी संबंधीताना आदेश जारी केले आहे.