नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा

By अजित मांडके | Published: June 16, 2023 03:36 PM2023-06-16T15:36:19+5:302023-06-16T15:36:38+5:30

आव्हाडांनी टीव्ट करतांना जीपीएस लोकेशनसह फोटो देखील टाकले आहेत. त्यानुसार कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते.

Remove the sludge from the drain in time, otherwise we will throw garbage in front of the municipal corporation, a serious warning to the municipal corporation | नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा

नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील नालेसफाईची कामे योग्य पध्दतीने झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु आता कळवा आणि मुंब्य्रात अद्यापही नालेसफाई झाली नसल्याचे विदारक चित्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ट करीत पुढे आणले आहे. पहिल्याच पावसात येथील नाल्यात कचºयाचे ढीग जमा झाले असून वेळीच नाल्यातील गाळ काढा अन्यथा नाल्यातील कचरा वाजत गाजत घेऊन येऊन महापालिका मुख्यालयासमोर टाकला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आव्हाडांनी टीव्ट करतांना जीपीएस लोकेशनसह फोटो देखील टाकले आहेत. त्यानुसार कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसून आले आहे. कळवा पूवेर्तील भास्कर नगर, पौण्डपाडा, वाघोबा नगर या परिसरामध्ये रहिवाशांच्या घरासमोर नाल्यातील कचरा आल्याचे दिसून आले. परंतु त्यानंतरही अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

उत्कर्ष आर्या नावाचा कोणी ठेकेदार आहे हे माहीत नाही, त्याला कामाचा किती अनुभव आहे हे माहीत नाही, तो काम देखिल करत नाही. एकतर मध्ये हे ठेकेदार आपल्याला बिले मिळणारच आहेत या विश्वासातून २२ ते २५ टक्के बीलो टेंडर टाकतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येते कि हे टेंडर परवडणारे नाही. हे सगळे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारच्या सेटिंगने चालते असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे वेळीच हे नाले साफ करून दिले नाही तर एक दिवस हाच कचरा महापालिका मुख्यालयाच्या समोर टाकला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मागील आठ महिने मी सत्ताधाºयांच्या विरोधात भुमीका घेत असल्यानेच माझ्या मतदार संघातील कामे होत नाहीत. विकास कामांसाठी आलेला निधी देखील पुन्हा वळता करण्यात आला आहे. आता नालेसफाईची कामे देखील केली गेलेली नाहीत. परंतु मी जनतेची कामे करत राहणार आहे. तुम्हाला आणखी काय करायचे असेल ते करा.
(जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्ट्रवादी)

Web Title: Remove the sludge from the drain in time, otherwise we will throw garbage in front of the municipal corporation, a serious warning to the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.