मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By जितेंद्र कालेकर | Published: March 23, 2023 09:01 PM2023-03-23T21:01:57+5:302023-03-23T21:02:20+5:30

मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

remove unauthorized mosques and dargahs on Mumbra Hill; MNS gave 15 days ultimatum | मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

googlenewsNext

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात 'लाव रे तो व्हीडीओ' द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दग्यार्चा पदार्फाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून सात ते आठ अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा, अन्यथा याठिकाणी हनुमान मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेने याबाबतचे निवेदनही गुरुवारी दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मस्जीद,मजार आणि दग्यार्ची उभारणी होत असल्याचे म्हटले होते. याच भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाºयांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवरील अनधिकृत दग्यार्चा प्रकार उघडकीस आणला आहे. याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दग्यार्ची अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. या दर्ग्यार्ची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांच्याकडून सर्व सोयीसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? येत्या १५ दिवसांत हे अतिक्रमण हटविण्यात यावे. अन्यथा, दर्ग्याच्या बाजुला हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरु करण्याचा इशारा जाधव यांनी दिला .

Web Title: remove unauthorized mosques and dargahs on Mumbra Hill; MNS gave 15 days ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.