खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

By admin | Published: April 20, 2017 04:03 AM2017-04-20T04:03:51+5:302017-04-20T04:03:51+5:30

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर

Removing obstacles in the Khadipulla road | खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

Next

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येथील रहिवाशांनी स्वत:हून घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. १४० रहिवाशांना बीएसयूपीमध्ये, तर ६० रहिवाशांना रेंटलच्या घरांत शिफ्ट केले आहे.
या पुलाच्या उभारणीसाठी कळवानाका, विटावा आणि साकेत भागांत खांबउभारणीचे काम सुरू आहे. कळवा खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर भागातून हा पूल
जाणार आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेली बेकायदा बांधकामे त्या कामात अडसर ठरू लागली होती. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने काही राजकीय पक्षांनी या भागातील मतांवर डोळा ठेवून कारवाईस विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई रखडली होती.
दरम्यान, या कामासाठी या भागातील २४० बांधकामे हटवण्याची कारवाई हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने पुन्हा घेतला. परंतु, पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने येथील कारवाईला ब्रेक लागला
होता. आता तो जवळपास सुटला असल्याने बुधवारी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत १४० लोकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये केले असून ६० लोकांना रेंटलच्या घरांमध्ये जागा दिली आहे. प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे येथील नागरिकांचा यापूर्वी कारवाईला असलेला विरोधदेखील आता मावळल्याने कारवाईविरोधात रान उठवणाऱ्या नेत्यांनीदेखील मवाळ भूमिका घेतली आहे. नागरिकांनीच सहकार्याची भूमिका घेतली असल्याने या उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. महासभा झाल्यानंतर उद्यापासून या सर्व बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Removing obstacles in the Khadipulla road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.