मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहाचे नूतनीकरण, एकाच वेळी २७ मृतदेह ठेवता येणार
By सदानंद नाईक | Published: December 5, 2023 07:44 PM2023-12-05T19:44:03+5:302023-12-05T19:44:09+5:30
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहातील एअरकंडिशन मध्ये बिघाड झाल्याने, गेल्या अनेक महिन्यापासून एअरकंडिशन रूम बंद होती.
उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहाचे नूतनीकरण आमदार कुमार आयलानी यांच्या निधीतून करण्यात येऊन मंगळवारी आमदार आयलानी यांच्या हस्ते एअरकंडिशन शवागृहाचे उदघाटन झाले. एकाच वेळी २७ मृतदेह ठेवता येणार असल्याची माहिती यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहातील एअरकंडिशन मध्ये बिघाड झाल्याने, गेल्या अनेक महिन्यापासून एअरकंडिशन रूम बंद होती. त्यामुळे एका दिवसा पेक्षा जास्त दिवस मृतदेह ठेवता येत नव्हता. आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार निधीतून शवागृहाच्या एअरकंडिशन नूतनीकरण कामाला सुरुवात झाली. अखेर सहा महिन्यानंतर शवागृह एअरकंडिशनचे काम पूर्ण झाल्यावर मंगळवारी शवागृहाचे उदघाटन आमदार कुमार आयलानी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. शवागृहात एकाच वेळी २७ मृतदेह कमीतकमी सहा महिने ठेवता येणार असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. तसेच रुग्णालयाच्या इतर विकासकामाला आमदार आयलानी यांच्या सहकार्यातून मिळाल्याचे बनसोडे म्हणाले.
मध्यवर्ती रुग्णालय अंतर्गत रस्ते, मुख्य शस्त्रक्रिया विभाग आदीचे कामेही प्रगतीपथावर असून रुग्णालयासाठी आवश्यक त्या कर्मचारी व डॉक्टरांची मागणी शासनाकडे केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. तर आमदार कुमार आयलानी यांनी रुग्णालयाच्या विकासासाठी जास्तीतजास्त निधी देणार असून नर्सिंग कॉलेज कार्यान्वित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.