खर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था; २० वर्षांपासून ग्रामस्थांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:54 AM2020-02-07T01:54:02+5:302020-02-07T01:54:22+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
खर्डी : मागील २० वर्षांपासून खर्डी रेल्वेस्थानक आणि महामार्गाला जोडणाऱ्या गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अगदी चालतानाही अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मुख्य गावाला जोडणारे रस्ते डांबरी होते, यावर विश्वासच बसत नाही, अशी आजची परिस्थिती आहे.
काष्टी ते दळखण, चांदे ते खर्डी, तळेखण-धामणी ते खर्डी, कुंभईपाडा-सुगाव ते खर्डी, वंगणपाडा ते खर्डीगाव, घाणेपाडा-बागेचापाडा ते खर्डी या विभागातील गावांना जोडणारे मुख्य रस्ते असून त्यांची दुरवस्था झाली आहे. रात्रीअपरात्री या रस्त्यांवरून ग्रामस्थांना रोजच जीवघेणा प्रवास करावा लागतो. रुग्ण, गर्भवतींना येथून येजा करताना त्रास होतो. हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेंतर्गत येत असल्याने या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाने करायची आहे.
येथील ग्रामपंचायती छोट्या आणि अदिवासीबहुल असल्याने रस्त्यांसाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेकडून किंवा आमदार, खासदार निधीतून या रस्त्यांची दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरु स्तीबाबत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
लवकरच या रस्त्यांच्या दुरु स्तीबाबत संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी दिले.
दोन रस्त्यांच्या कामाला सुरुवात
समृद्धी महामार्गाजवळील दळखण, काष्टी, धामणी तळेखण, खर्डी चांदा, पेठ्यापाडा, वाशाळा येथील जिल्हा परिषदेंतर्गत रस्ते समृद्धी महामार्ग बनविणारी कंपनी रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. तसेच घाणेपाडा, बागेचापाडा या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याची
माहिती जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत यांनी दिली.