जिल्ह्यातील १०७ ब्लॅक स्पॉट्सची होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:00 AM2018-12-07T01:00:42+5:302018-12-07T01:00:50+5:30
१०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ची अधिकाऱ्यांच्या समितीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत गुरुवारी दिले.
ठाणे : जिल्ह्यातील सर्व शहरे, ग्रामीण भागात, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मार्गांवरील १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ची अधिकाऱ्यांच्या समितीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत गुरुवारी दिले. यासाठी दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना तातडीने समितीकडे नोंदवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुभाजक तोडणाºया पेट्रोलपंपचालक आणि हॉटेलचालकांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले.
लोकमतने या अपघातस्थळांकडे सतत प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘माळशेजसह भिवंडी बायपासवरही ब्लॅक स्पॉट्स’ या मथळ्याखाली लोकमतने २७ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी बैठक घेऊन संबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देऊन समितीदेखील गठीत केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी रस्तासुरक्षेच्या विषयाचा आढावा सर्वोच्च न्यायालयापुढे जात असल्याने अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने अपघात कमी कसे होतील, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
>हे आहेत ब्लॅक स्पॉट्स
यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बोलताना स्पष्ट केले की, ठाणे शहर परिसरात राष्ट्रीय महामार्गांवर १८ आणि राज्य महामार्गांवर १२, इतर मार्गांवर २९ असे ५९ ‘ब्लॅक स्पॉट्स’ असून ठाणे ग्रामीण भागात राष्ट्रीय महामार्गांवर २७, राज्य महामार्गांवर ११ आदी ३८ अपघातस्थळे असल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबई भागात १० आणि मुंबई-अहमदाबाद या द्रुतगती महामार्गावर एक अशा १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’वर या बैठकीत संबंधित अधिकाºयांसमक्ष चर्चा करण्यात आली.
>ही होणार कामे
रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजनांचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागांशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य आणि जिल्ह्यांतील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवरआवश्यक ती दुरु स्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्र ॉसिंग पट्टे रंगवणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रु ग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडिट आदी कामे सातत्याने करण्याचे या बैठकीत निश्चित झाले.
>दुभाजक तोडणाºया पेट्रोलपंप, हॉटेलचालकांवर कारवाई
शहापूर ते पुढे कसाºयापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक काही ठिकाणी तोडण्यावर या बैठकीत चर्चा झाली. मार्गालगतचे पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल तसेच गावकºयांनी आपापल्या सोयीसाठी ते तोडून येजा करण्यासाठी वाट केली आहे. याशिवाय, शहापूर ते पडघा मार्गालगत ग्रामपंचायतीकडून कचरा व डेब्रिज टाकले जाते. त्याला आग लावल्यामुळेही धूर होतो आणि दृश्यमानता कमी होते. याची दखल घेऊन पोलिसांनी संबंधितांवर त्वरित कारवाई केली पाहिजे, असे सांगण्यात आले.