शिरगावच्या डोंगराला पुन्हा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:37 AM2019-03-16T00:37:51+5:302019-03-16T00:37:57+5:30

बदलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत वणवा पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत

Repeat the hill of Shirgaon | शिरगावच्या डोंगराला पुन्हा वणवा

शिरगावच्या डोंगराला पुन्हा वणवा

Next

बदलापूर : बदलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत वणवा पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वनसंपदा या वणव्याच्या विळख्यात सापडली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कात्रप परिसरात लागलेल्या वणव्याने शेकडो एकर जंगल जळून खाक झाले. तर, आता शिरगावमागील परिसरात असलेल्या डोंगराचा मोठा भाग वणव्यात जळून खाक झाला आहे. वणवे सातत्याने लागत असताना वनविभाग मात्र या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कासगाव येथील डोंगरालाही बुधवारी रात्री वणवा लागला होता.

बदलापूर आणि परिसराला मोठी वनसंपदा लाभली आहे. त्यामुळे येथे वनक्षेत्रपाल कार्यालयही आहे. या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतात. वनविभागाच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या डोंगरवणव्याने जळून खाक होत असताना वनविभाग मात्र ढिम्म बसून आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर, वनअधिकारी आता माहिती मिळाली आहे, कर्मचारी पाठवतो, बघतो, असे उत्तर देत आपली अकार्यक्षमता दाखवली आहे.

वणवा पेटत असताना संपूर्ण शहरात तो दिसतो, त्यावेळेस वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न बदलापूरकरांना पडला आहे. वणवे पेटण्याच्या प्रकारात बेजबाबदार आणि दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, अंबरनाथमध्येही अशाचप्रकारे वनसंपदा नष्ट झाली होती.

Web Title: Repeat the hill of Shirgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.