टेम्पो बंद पडल्याने पुन्हा कळवा खाडीपुलावर कोंडी

By admin | Published: August 19, 2016 01:46 AM2016-08-19T01:46:28+5:302016-08-19T01:46:28+5:30

एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाहनांची संख्या वाढलेली असतांनाच कळवा खाडी पुलावर टेम्पो बंद पडल्याने वाहतूककोंडीत गुरुवारी आणखी भर पडली. हा टेम्पो अर्ध्या

Repeat the tempo after shutting down | टेम्पो बंद पडल्याने पुन्हा कळवा खाडीपुलावर कोंडी

टेम्पो बंद पडल्याने पुन्हा कळवा खाडीपुलावर कोंडी

Next

ठाणे : एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाहनांची संख्या वाढलेली असतांनाच कळवा खाडी पुलावर टेम्पो बंद पडल्याने वाहतूककोंडीत गुरुवारी आणखी भर पडली. हा टेम्पो अर्ध्या तासाच्या अवधीत हटविण्यात आला. परंतु, या काळात झालेली कोंडी दूर होण्यासाठी तासभर लागल्यामुळे अनेकांचा या मार्गावर खोळंबा झाला होता. यामुळे आदल्या दिवशी नारळी पौर्णिमेमुळे या भागात वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांनादुसऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशीही बंद पडलेल्या टेम्पोने चांगलाच मनस्ताप दिला.
कळवा ते ठाणे जाणाऱ्या मार्गावरील खाडी पुलावर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो अचानक बंद पडला. त्यामुळे झालेल्या कोंडीमुळे कळवा ते नवी मुंबईच्या विटावा प्रवेशद्वारापर्यंत तसेच ठाणे दिशेकडील साकेत आणि दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलापर्यत दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रक्षाबंधन सणामुळे वाहनांची आधीच गर्दी झाली होती. त्यात या टेम्पोमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी वाढली होती. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास तो क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला. ४ वा. नंतर वाहतूक सुरळीत झाली.


अशा प्रकारे कळवा, साकेत, कॅडबरी येथील उड्डाणपुलांवर वाहने बंद पडण्याचे प्रकार घडतात. कधी टायर बस्ट होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. कळवा आणि कापूरबावडीनाक्यावर त्यासाठी वाहतूक शाखेने २४ तास क्रेन्स ठेवल्या आहेत. असे वाहन बंद पडल्यानंतर ते तिथून हटविण्यापर्यत १५ ते २० मिनिटे जातात. ते हटविण्यापर्यंत ही कोंडी राहते. गुरुवारी झालेली कोंडीही वाहतूक पोलिसांनी काही काळातच दूर केली.
- संदीप पालवे, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

Web Title: Repeat the tempo after shutting down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.