धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:02 PM2020-08-27T18:02:47+5:302020-08-27T18:03:17+5:30

भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी मागणी केली की धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना कल्याण जिल्ह्यात फिरू देणार नाही.

The repercussions of the beating of students in Dhule are palpable; Protest agitation by BJP Youth Front | धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन 

धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन 

Next

डोंबिवली: धुळे येथे विध्यार्थी हिताच्या मागण्या पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, गोर गरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली कडून निषेध करण्यात आला. या वेळी बोलताना भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी मागणी केली की धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना कल्याण जिल्ह्यात फिरू देणार नाही.

भाजयुमो पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर ह्यांनी, विद्यार्थी प्रश्नावर सरकारचे अपयश लक्षात घेता, शिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. भाजयुमो च्या मागण्यामध्ये कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हाफत्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. 

अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.

उपरोक्त मागण्यांसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली परंतु असंवेदनशील पालक मंत्र्यांनी भेट नाकारली, यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतः च्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला;यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे, आशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे, कोरोना च्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे, याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयसामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा.तरी वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलने करेल याची दखल घेण्यात यावी अशी माहिती पक्षाचे जिल्हा युवध्यक्ष मिहीर देसाई, मितेश पेणकर यांनी दिली.

Web Title: The repercussions of the beating of students in Dhule are palpable; Protest agitation by BJP Youth Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.