बदलापूरात 25 लाख रुपये बोनस रिक्षा चालकांना वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 06:26 PM2017-10-12T18:26:57+5:302017-10-12T18:27:51+5:30

Replacement bonus of 25 lakh rupees for all auto rickshaw drivers | बदलापूरात 25 लाख रुपये बोनस रिक्षा चालकांना वाटप

बदलापूरात 25 लाख रुपये बोनस रिक्षा चालकांना वाटप

Next

अंबरनाथ : कामगारांना ज्या प्रमाणे दिवाळीत बोनस मिळतो तो बोनस रिक्षा चालकांनाही मिळावा यासाठी रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला होता. दरवर्षी रिक्षा चालक आपल्या कमाईतील रक्कम बाजुला ठेवत ती रक्कम व्याजसहीत दिवाळीत बोनस म्हणून स्वीकारत आहे. यंदा 25 लाख रुपये रिक्षा चालकांना बोनसच्या स्वरुपात वाटप करण्यात आले. 

दिवाळीत रिक्षा चालकांना हातात पैसे शिल्लक रहावे यासाठी बोनस या संकल्पेवर आधारीत बचत योजना सुरु केले होते. या योजनेत अनेक रिक्षा चालक दररोज या बचत योजनेत पैसे गुंतवीत होते. बचत केलेली रक्कम ही दिवाळीत रिक्षा चालकांना वाटप केली जाते. ही योजना 2003 मध्ये सुरु करण्यात अली होती. त्यावेळेस केवळ 18 रिक्षा चालक सहभागी झाले होते. आता या योजनेला 15 वर्ष उलटले असुन यंदाच्या वर्षी 277 रिक्षा चालक सहभागी झाले होते. त्यांनी जमविलेल्या पैशांसोबत व्याजासहीत या रिक्षा चालकांना तब्बल 25 लाख 10 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यातील सर्वाधिक रक्कम ही सुखदेव आहिरे या रिक्षा चालकाने मिळवली असुन त्याच्या वाटय़ाला 1 लाख 10 रुपये बोनस स्वरुपात मिळाले आहे. तर बाळा कुरपाणो यांना 66 हजार आणि राम गोपाळ यादव यांना 43 हजार रुपये मिळाली आहे. या सोबत 10 ते 30 हजार रुपये मिळविणारे अनेक रिक्षा चालक  अहोत. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश खिल्लारे, खजिनदार तुळशिराम घावट आणि सरचिटणीस किशोर मोहिते यांनी या योजनेसाठी सर्वाधिक प्रयत्न केले होते. त्यांना सुर्यकांत चव्हाण, सुभाष पाटील, राजू तावडे, दिलीप जमदरे यांनी देखील या योजनेत सहकार्य केले आहे. त्यामुळेच ही योजना यशस्वी झाली आहे. 

Web Title: Replacement bonus of 25 lakh rupees for all auto rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.